Fees Dainik Gomantak
गोवा

Pre-Environmental Clearance: गोव्यातील प्रकल्प पूर्वपर्यावरणीय मंजुरी शुल्कात वाढ, अधिसूचना जारी; 30 लाखांपर्यंतची मर्यादा

Environmental clearance charges: सरकारने जारी केलेल्या या अधिसूचनेत नदी खोरे प्रकल्प, खनिज लाभ प्रकल्प, बंदर व हार्बर, महामार्ग, विमानतळ इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.

Sameer Panditrao

Project Pre-Environmental Clearance Fee

पणजी: राज्य सरकारने गोव्यातील विविध प्रकल्प श्रेणींमधील पूर्वपर्यावरणीय मंजुरीसाठी प्रकल्पांच्या प्रशासन तथा प्रक्रिया शुल्कात सुधारणा करण्याची अधिसूचना जारी करून त्यात वाढ केली आहे. ही शुल्कवाढ इमारत सुधारणा व बांधकाम तसेच लघु व प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी असून ती क्षेत्रफळाच्या आधारावर आहे. कमीत कमी १ लाख, तर अधिकाधिक ३० लाखांपर्यंत शुल्क आहे.

सरकारने जारी केलेल्या या अधिसूचनेत नदी खोरे प्रकल्प, खनिज लाभ प्रकल्प, बंदर व हार्बर, महामार्ग, विमानतळ इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. रेती, खडी, चिरेखाणी यांसारख्या लघुखनिजांच्या नवीन उत्खननासाठी शुल्क १ लाख ते १.५ लाख रुपयांपर्यंत आहे, तर प्रमुख खनिजांसाठी शुल्क १५ लाख ते ३० लाखापर्यंत आहे. विस्तार, हस्तांतरण सुधारणा इत्यादीसाठी शुल्क रचना वेगळी आहे. शिवाय गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानेही (जीसीझेडएमए) उच्च भरती रेषेच्या सीमांकनासाठी शुल्कात वाढ जाहीर केली असून त्याचीही अधिसूचना जारी केली आहे.

या प्राधिकरणाच्या सर्वेक्षण नकाशावर उच्च भरती रेषा २०० मीटर, ५०० मीटर व ना विकास क्षेत्र (एनडीझेड) सीमांकन करण्यासाठी शुल्क १ः४००० च्या प्रमाणात लागू केले आहे. तसेच व्यक्ती, कायदेशीर वारस, वकील व सरकारी संस्थांसह अर्जदारांनी हे शुल्क गोवा किनारपट्टी व पर्यावरण व्यवस्थापन संस्थेकडे (जीसी ॲण्ड ईएमएस) जमा करायचे आहेत. सरकारने मंजूर केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०११ नकाशे (१ः२५००० स्केल) संदर्भासाठी ‘जीसीझेडएमए’च्या संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध केल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT