Goa Police Dainik Gomantak
गोवा

'गोवा पोलिसांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न'

पोलिसांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने मंगळवारी केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी गोव्यातून पाठवलेल्या पोलिसांची सरकारकडून मोठ्या प्रमाणात सतावणूक केली जात असून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने मंगळवारी केला.

पोलिसांना (Police) मतदानासाठी आणण्याकरता सरकारी खर्चाने बसेस पाठवण्यात येत आहेत. या बसेस लांबच्या पल्ल्यासाठी अयोग्य असून त्यांना रेल्वेतून आणावे अन्यथा निवडणूक कार्यालयाने अधिकारी पाठवून त्यांचे मतदान करावे, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने केली आहे. अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला सादर केले. यावेळी सुनील कवठणकर आणि दुर्गादास कामत उपस्थित होते.

गोव्यासोबत (Goa) उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) निवडणूक होत आहे. यासाठी गोव्यातून 900 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उत्तर प्रदेशात पाठवले आहेत. यापैकी साडेचारशेहून अधिक राखीव दलाच्या पोलिसांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलेले नाही. त्यांना आता गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रवास दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त असून तो साध्या बसेसने करणे नाही शक्य नाही. शिवाय कदंब महामंडळाच्या बसेस इतक्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य आहेत, असे कवठणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT