Goa Government | CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: 'रस्ते होतील, थोडी कळ सोसा'- प्रमोद सावंत

Goa Government: वाढत्या रस्ते अपघातांत मृत्युंचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: जनसुनावणीवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी करमल घाट रस्ता रुंदीकरणाचा विषय मांडला. या रुंदीकरणासाठी काही झाडे कापावी लागतील, असे त्यांनी सांगितले. रुंदीकरणासाठी स्थानिकांनी जमिनी देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पर्वरीत उड्डाण पूल होणार आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उपाय योजले जातील. पण चांगले होण्यासाठी थोडी कळ सोसावीच लागते, असे ते म्हणाले. वाढत्या रस्ते अपघातांत मृत्युंचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

येत्या 15 दिवसांत हा आराखडा तयार करून 1 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. आज त्यांनी मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिट्यूटच्या सभागृहात वाहतूक सुरक्षा मंचच्या जनसुनावणीवेळी त्यांनी जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल आणि अधिकारी उपस्थित होते. कायद्याचे कडक पालन केल्यास जनमानसातून लगेच रोष व्यक्त होतो. पण आता जनतेनेच कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी केल्याने जनतेला जसे हवे आहे, तसे होईल, असे मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

महत्त्वाच्या सूचना

  •    वाहन पार्किंग सुविधा असल्याशिवाय मॉलना परवानगी देऊ नये

  •    चिंबल येथील उड्डाण पूल लवकर पूर्ण करावा.

  •    गतिरोधकाचा आकार समान असावा, वेगवेगळा असू नये.

  •    रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उपाय शोधावा.

  •    वाहन चालन प्रशिक्षण केंद्र सरकारी असावे.

  •    रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणावेळी जुने डांबर काढावे

  •    धारगळ-दोन खांब येथे उड्डाण पूल बांधावा.

  •    हमरस्त्यावर सतत कडक गस्त ठेवावी.

  •    म्हापसा-पेडे जंक्शनवरील समस्या सोडवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT