Goa government issues new rules regarding corona Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: कोरोनासंदर्भात गोवा सरकारची नवीन नियमावली जारी

आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसांदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी कोरोनासंबंधी सरकारचे काही नवे नियम जाहीर केले आहेत.

Kavya Powar

Goa Corona Update: सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करूनही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही. मागील काही दिवसात तर कोरोनाने (Corona) कहर केला आहे. रुग्णसंख्येने हजारी पार केली आहे. यातच ओमिक्रॉन (Omicron) बाधितांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. गोव्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी गोव्यात नाईट कर्फ्यू करण्याची मागणी केली होती, पण तूर्तास सरकारने यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. पण सरकारतर्फे काही नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. (Goa government issues new rules regarding corona)

आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसांदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी कोरोनासंबंधी सरकारचे काही नवे नियम जाहीर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, गोव्यात सार्वजनिक ठिकाणी सभा, कार्यक्रम किंवा मेळाव्यासाठी 100 लोकच उपस्थित राहू शकतात. त्याचबरोबर कार्यक्रम घरगुती किंवा हॉलवर आयोजित केल्यास जागेच्या एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्केच उपस्थितीला परवानगी आहे. ह्या निर्बंधांचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास गोवा पोलिसाना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारची नवीन नियमावली

  • सभा, मेळावे, प्रचार किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी 100 लोकांच्या उपस्थितीला परवानगी

  • 100च्या वर लोक उपस्थित असल्यास गोवा पोलिसांकडून कारवाई

  • कोणत्याही पक्षाच्या प्रचार सभेला 100 लोकांचीच उपस्थिती

  • अंतर्गत कार्यक्रमांसाठी जागेच्या एकूण क्षमतेच्या 50% उपस्थितीला परवानगी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT