CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सुदृढ, कुशल गोव्यासाठी सरकार कटिबद्ध; मुख्यमंत्री सावंत

Goa Government: दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Goa Government:

‘विकसित भारत आणि विकसित गोवा’ संकल्पनेनुसार गोवा सरकार सुदृढ, कुशल आणि सर्वसमावेशक गोवा साकारण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे नमूद केले. गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रंसगी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष व साळगावचे आमदार केदार नाईक, समाजकल्याण खात्याचे सचिव सुभाष चंद्र, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य समाजकल्याण संचालक अजित पंचवाडकर,

राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका मेघना शेटगांवकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक सचिव यांचीही प्रमुख उपस्थिती होती. नतून कार्यालय इमारतीच्या उद्‍घाटनाबरोबरच या कार्यक्रमादरम्यान,

दिव्यांगजनांसाठी सुलभ व दर्जेदार जीवन प्रदान करण्याच्या उद्देशाने गरजू दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांचे वितरणही करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा 2024 या उपक्रमाबाबतच्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कृत्रिम अवयवांचे वितरण

फळदेसाई म्हणाले, प्रथमच, आम्ही एकाच वेळी ३०० दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचे वितरण करत आहोत. एका एका कृत्रिम अवयवाची किंमत ६० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्वरूपात कृत्रिम अवयवांचे वितरण गरजूंना करणे ही एक अतुलनीय कामगिरी ठरत असून यातून दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी राज्य शासनाची जपलेली बांधीलकी अधोरेखित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT