tarun tejpal 19 may.jpg 
गोवा

Tarun Tejpal: तरुण तेजपाल विरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात

दैनिक गोमंतक

तेहलकाचे (Tehelka) माजी संस्थापक-संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. म्हापसा (Mapusa) येथील गोवा सत्र न्यायालयाने या 21 मे रोजी बद्दलचा निकाल दिला होता.  हा निकाल समोर आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांनी या निकालाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते.  त्यानुसार गोवा सरकारने आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Goa government has filed a petition in the High Court in the Tarun Tejpal case)

21 मी रोजी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायमुर्ती क्षमा जोशी यांनी या प्रकरणाचा निवाडा दिला होता. त्यानंतर निकालानंतर पणजी (Panjim) येथे पत्रकार परिषदेत बोलताना "तेजपाल प्रकरणात सर्व ठोस पुरावे उपलब्ध असताना एका महिलेवर झालेला अन्याय गोवा राज्यात सहन केला जाणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याची तयारी आम्ही सुरू केली असल्याचे म्हणत, या प्रकरणी संशयिताच्या विरोधात ठोस पुरावे असल्यामुळे तो संशयित या प्रकरणातून सुटूच शकत नाही असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता.

दरम्यान, तरुण तेजपाल यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार) 341, 342, 354 अ व 354ब या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहकारी तरुणीचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. सुमारे सात वर्षांपूर्वी अर्थांत वर्ष 2013 मध्ये गोव्यात बांबोळी येथील एका पंच तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते व ते राष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले होते.  
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT