Goa Water Tariff Hike Dainik Gomantak
गोवा

Water Bill Hike in Goa : पाणी दरवाढीवर सरकार ठाम

मंत्री नीलेश काब्राल यांची माहिती; संतप्त विरोधक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

गोमन्तक डिजिटल टीम

Water Bill Hike in Goa : सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी बिलात केलेल्या 5 टक्के दरवाढीवर सरकार ठाम आहे. त्यात प्रत्येक वर्षी 5 टक्क्यांनी वाढ करण्यात येईल, असे खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. यावर काँग्रेससह इतर विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

पाणी बिलावरील दरवाढीवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सध्या पाणी बिलात झालेली दरवाढ ही मे 2020 मधील आहे. मात्र, त्यावेळी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ती लागू करता आली नव्हती. नंतर 15 ऑगस्ट 2021 ला सरकारच्या वतीने राज्यातील जनतेला 16 हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू केली. या योजनेच्या अधिसूचनेमध्येच ही प्रस्तावित दरवाढ होती. प्रत्येक वर्षी त्यात 5 टक्क्यांनी दर वाढवले जातील, असेही त्यात नमूद होते. त्यामुळे सरकार आत्ताच दरवाढ मागे घेणार नाही.

सोळा हजार लिटरची मोफत पाणी योजना सुरूच

सप्टेंबर 2021 पासून राज्यात सुरू केलेली 16 हजार लिटर मोफत पाणी योजना अद्यापही सुरू आहे. पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि सर्वांना पाणी मिळावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याबाबतच्या लाभार्थींची श्‍वेतपत्रिका लवकरच काढण्यात येईल. शिवाय या योजनेमध्येही बदल करून ती नव्याने जाहीर करण्यात येईल, असे मंत्री नीलेश काब्राल पत्रकार परिषदेत म्हणाले. यानंतर काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी राज्य सरकारवर टीका करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सामान्य नागरिक  त्रस्त

इंधन, गॅस, जीवनावश्यक वस्तूंनंतर वीजबिल आणि आता पाणी बिल देखील वाढविण्यात आल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांनी दिला.

दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले. आप नेते अमित पालेकर यांनीही या दरवाढीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT