Mineral Blocks |Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोवा सरकारकडून आणखी पाच खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव जाहीर

राज्य सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने आता 5 खनिज ब्लॉक्स विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Government: राज्य सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने पहिल्या चार खनिज ब्लॉक्‍सची यशस्वी विक्री केल्यानंतर आता आणखी 5 ब्लॉक्स विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्‍यात अडवलपाल-थिवी, कुडणे-करमळे, कुडणे, थिवी-पीर्ण, सुर्ल-सोनशी या ब्लॉक्सचा समावेश आहे.

27 मार्चपर्यंत बोलीधारकांना आपल्या निविदा दाखल करता येतील. खाण खात्याने पहिल्या टप्प्यात डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव या उत्तर गोव्यातील तीन व दक्षिण गोव्यातील काले अशा एकूण चार ब्लॉक्सचा ई-लिलाव पूर्ण केला आहे.

डिचोली ब्लॉक सेझा (वेदांता) कंपनी, शिरगाव-मये ब्लॉक साळगावकर शिपिंग प्रा. लि. कंपनी, मोंत द शिरगाव ब्लॉक बांदेकर माईन कंपनी तर काले ब्लॉक फोमेंतो कंपनीने सर्वाधिक बोली लावून आपल्याकडेच ठेवले आहेत.

ई-लिलाव पूर्ण झाल्याने आता सर्वांना खाणी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

SCROLL FOR NEXT