Goa News | Fishing in goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा राज्यात सागरी अंमलबजावणी शाखा!

Goa News: बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात अवैधरित्या होत असलेली एलईडी आणि बुलट्रॉलिंग मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आणि कायमस्वरूपी सागरी अंमलबजावणी शाखा स्थापित करण्याचा प्रस्ताव मच्छीमार खात्यामार्फत मांडला आहे. समुद्रात या शाखेमार्फत पोलिस बोटीमधून गस्त घालणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती मच्छीमार खात्याने दिली आहे.

खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करणे कठीण होत असल्याने हा प्रस्ताव मांडला आहे. मच्छीमार खात्याच्या संचालक शमिला मोन्तेरो यांनी हा प्रस्ताव मांडला असून मच्छीमार खात्याच्या मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मान्यता दिली आहे.

12 बोटींच्या खरेदीचा प्रस्ताव

अंमलबजावणी शाखेत मच्छीमार अधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांसह 58 कर्मचारी समाविष्ट आहेत. गोव्याच्या अखत्यारित येणाऱ्या समुद्रात गस्त घालण्यासाठी मच्छीमार खात्याच्या पाच गस्ती बोट आणि किनारी पोलिसांसाठी सात गस्ती बोट खरेदी करण्यास मंजुरी देण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असे मोन्तेरो यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT