Goa Government | Pramod Sawant | Amit Shah Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोव्यात अमली पदार्थांविरोधात मोहिमेवर केंद्रीय गृहमंत्री समाधानी

Goa Government: गोवा सरकारने राज्यातून अमली पदार्थांविरोधी जी पावले उचलली आहेत, त्याबद्दल शहा यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: देशातील ड्रग्ससंदर्भातची समस्या व होणारी उलाढाल यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्याचा बिमोड करण्यासाठी देशभरातील राज्यांनी उचललेल्या पावलांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल राज्यांच्या गृहमंत्र्यांकडून घेतली.

दरम्यान, यावेळी त्यांनी ड्रग्स दलाल व विक्रेत्यांविरोधात कठोर पावले उचलण्याबरोबरच जनजागृतीचे आवाहन केले. गोवा सरकारने राज्यातून ड्रग्‍सचा नायनाट करण्यासाठी जी पावले उचलली आहेत, त्याबद्दल शहा यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

तसेच, या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी ड्रग्‍सची 161 प्रकरणे नोंद झाली व सुमारे 4.5 कोटींचा अंमलीपदार्थ जप्त कऱण्यात आला. गेल्या तीन वर्षांत बेकायदा वास्तव्यप्रकरणी 129 विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची पाठवणी करण्यात आली आहे.

गोव्यात नोकरीच्या निमित्ताने रेल्वे व बसने येणारे मजूर तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकही ड्रग्‍स गोव्यात घेऊन येतात. राज्याला ड्रग्‍सपुरवठा करणारे पर्यटक नको आहेत. या कृत्‍यांत गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्‍यमंत्र्यांनी दिला.

'त्‍या' रेस्‍टॉरंट्‌सविरोधात कडक कारवाई करणार

रात्रीच्या संगीत रजनी पार्ट्यांमध्ये ड्रग्‍सची विक्री होत असल्याचे सापडल्यास त्‍या रेस्टॉरंटविरोधात ठोस कारवाई केली जाईल. बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या विदेशींसाठी बंदिस्त केंद्र तसेच भारतातून पाठवणी करण्याची प्रक्रिया, तसेच पीट एनडीपीएस कायद्याखाली हल्लीच पोलिसांनी ड्रग्‍समध्ये यापूर्वी गुंतलेल्या तिघांना अटक केली असल्याची माहिती बैठकीत गोवा सरकारतर्फे देण्यात आली. त्याची दखल शहा यांनी घेतल्याचे मुख्‍यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT