Goa Water Metro Dainik Gomantak
गोवा

Water Metro: गोव्यात लवकरच धावणार 'वॉटर मेट्रो'! सागरमाला शिखर समितीत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; रो रो सेवेलाही प्राधान्य

Goa Water Metro: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बंदराशी जोडलेल्या औद्योगिकरणामुळे निर्यातीच्या माध्यमातून विकासाची संधी उपलब्ध होईल

Sameer Panditrao

पणजी: राज्यात जल मेट्रो सुरू करण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करत आहे. केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत असे निर्णय घेत जल मेट्रोचा वापर करत रस्ता वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा गोवा सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्ली येथील बैठकीत नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, किनारी राज्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

रो रो सेवेलाही प्राधान्य

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बंदराशी जोडलेल्या औद्योगिकरणामुळे निर्यातीच्या माध्यमातून विकासाची संधी उपलब्ध होईल आणि हे केंद्र सरकारच्या बंदर-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. किनारी समुदायाचा विकास महत्त्वाचा असून कौशल्यवृद्धी, सामाजिक व आर्थिक समावेशकता आणि आर्थिक वाढ यांवर भर दिला जात आहे. तसेच, रो रो सेवा आणि जल मेट्रोसारख्या नव्या संधींचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT