Govt Pensioners Dainik Gomantak
गोवा

Govt Pensioners: सरकारी निवृत्तीवेतनधारकांची चांदी! 58 टक्क्यांवरून थेट... सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Dearness Relief Hike: गोवा राज्य सरकारने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्र सरकारचा सुधारित महागाई भत्ता (डेअरनेस रिलिफ) दराचा स्वीकार केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा राज्य सरकारने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्र सरकारचा सुधारित महागाई भत्ता (डेअरनेस रिलिफ) दराचा स्वीकार केला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या या निर्णयान्वये महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के (मूळ निवृत्तीवेतन) पर्यंत वाढविण्यात आला आहे.

राज्य वित्त विभागाने (महसूल आणि नियंत्रण विभाग) जारी केलेल्या निवेदनानुसार, ही वाढीव महागाई मदत १ जानेवारी २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीच्या थकबाकीसह, जून २०२६च्या निवृत्तीवेतनाच्या जोडीने अदा केली जाईल.

हा सुधारित दर केंद्राच्या एका निर्णयावर आधारित आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारचे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिरिक्त २ टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात आला होता.

या लाभाचा समावेश निवृत्तीवेतनधारकांच्या सर्व श्रेणींसाठी करण्यात आला आहे. ज्यामध्ये कुटुंब निवृत्तीवेतनधारक, सशस्त्र दलातील निवृत्तीवेतनधारक, रेल्वे निवृत्तीवेतनधारक, अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक आणि तात्पुरते निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT