पत्रकार परिषदेत युवा एकवोटचे कृष्णा साळकर व इतर  Dainik Gomantak
गोवा

गोवा तृणमूल काँगेसने 'त्या' व्यंगचित्राबद्दल माफी मगावी

'गोवा तृणमूल काँगेसच्या व्यंगचित्राचा' युवा मोर्चा एकवोटच्यावतीने जाहीर निषेध

Dainik Gomantak

Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांच्यासंबंधी गोवा तृणमूल काँगेसने (Goa TMC) जे व्यंगचित्र (Cartoon) प्रसिद्ध केले होते, त्याचा आम्ही युवा मोर्चा एकवोटच्यावतीने (Yuva Morcha Ekvott) निषेध करतो, असे माजी नगरसेवक दाजी साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी संबंधितांनी जाहीर माफी मागावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी हरिपाल पटेल, कृष्णा शेट्ये, किशोर वळवईकर, गिरीश बोरकर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी जगामध्ये एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यासंबंधी असे व्यंगचित्र प्रसिद्ध करून तृणमूल काँग्रेसने आपली मानसिकता दाखविली असल्याचा दावा साळकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याचा चौफेर विकास साधत आहेत. सरकारने जनहितासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळेच विविध क्षेत्रात उत्तम विकास झालेला आहे.

तृणमूलने प्रसिध्द केलेल्या व्यंगचित्रात या तिन्ही नेत्यांना पायाखाली चिरडण्यात येत असल्याचे दाखवले आहे. त्यांच्या या कृत्याचा आपण निषेध करत आहे. गोवेकर शांत आहेत, तथापि ते तृणमूल काँग्रेसची मानसिकता सहन करणार नाहीत. तृणमूल काँग्रेसने पंतप्रधानपदाची शान ठेवावी. त्यांचा मान राखावा, असे त्यांनी म्हटले. या व्यंगचित्र प्रकाराचा सर्वत्र निषेध होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT