Construction under process for Goa Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

Goa: भूगर्भ तपासणीशिवाय ‘मोपा’चे बांधकाम रेटणे धोकादायक

मोपा विमानतळाच्या (Goa) बांधकाम क्षेत्रात (Mopa Airport) काही दिवसांपूर्वी मोठमोठी भुयारे आढळली आहेत

दैनिक गोमन्तक

पेडणे : मोपा विमानतळाच्या (Goa) बांधकाम क्षेत्रात (Mopa Airport) काही दिवसांपूर्वी मोठमोठी भुयारे आढळली आहेत, तर विमानतळ बांधकामासाठी सपाटीकरण केलेल्या जागी भुयारसदृश विवरे सापडत आहेत. काही वर्षांपूर्वी विमानतळ प्रकल्पापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर उगवे (Goa Ugve) येथील आडवण तर दुसऱ्या बाजूने कासारवर्णे भागातील डोंगरांचे भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भूगर्भ तपासणीशिवाय विमानतळाचे बांधकाम पुढे रेटणे धोकादायक ठरू शकते.

या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता विमानतळ क्षेत्राच्या परिसरातील माती ठिसूळ आहे, हे स्पष्ट होते. १९८१ मध्ये पावसाळ्यात उगवे येथील आडवण हा मोठ्या डोंगराचे भूस्खलन झाले होते, तर त्याच्यापूर्वी कासारवर्णे येथेही (Kasarvane Goa) अशाच प्रकारे मोठ्या डोंगराचे भूस्खलन झाले होते.

भूस्खलन झालेले दोन्ही बाजूकडील डोंगर हे मोपा विमानतळ (Mopa Airport) क्षेत्रापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहेत. (Goa) त्यामुळे विमानतळ बांधकाम क्षेत्रातील भूगर्भाची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. एकेदिवशी सकाळी आम्ही काही शेतकरी रानात गेलो असता, उगवे येथील आडवण भागातील डोंगर तब्बल दोन माड उंचीइतका खचला होता. एवढा मोठा डोंगर खचणे, हे आमच्यासाठी मोठेच आश्‍चर्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आमच्यासोबत येऊन या डोंगराची पाहाणी केली. कोसळलेल्या डोंगराभोवती त्यांनी दगडी कुंपण घालण्याचे आश्वासन दिले होते.

पण त्याची पूर्तता झालीच नाही. डोंगर खचल्यानंतर सुमारे दहा वर्षे येथे दलदल होती. त्यामुळे या डोंगराच्या बाजूला असलेल्या शेती व काजू बागायतीत आम्ही दूरवरून जायचो, असे अरुण वासुदेव महाले (Arun Mahale) म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT