Goa Gcet Exam Result
Goa Gcet Exam Result Dainik Gomantak
गोवा

Goa: जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

Dhananjay Patil

पर्वरी : तांत्रिक शिक्षण संचालनालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमातील इंजिनिअरिंग (Goa) आणि (Gcet) फार्मसी पदवी प्रवेशासाठी घेतलेल्या समान प्रवेश परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) तांत्रिक शिक्षण संचालक विवेक कामत (vivek Kamat) यांनी जाहीर केला. या परीक्षेसाठी एकूण २९३५ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा प्राचार्य डॉ. व्ही. एन. शेट गोवा इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या मार्गदर्शनाखाली १६ केंद्रांवर ता. २९ आणि ३० जुलै रोजी घेतली होती. ही परीक्षा भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि गणित या विषयावर आधारित होती. आयआयटी मुंबई यांनीही ही परीक्षा घेण्यासाठी सहकार्य केले होते. यंदाच्या गोवा समान प्रवेश परीक्षेच्या विषयावर आकडेवारीतील ठळक मुद्दे : भौतिकशास्त्र विषयात एकूण २९३५ पैकी २८२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात सर्वाधिक ५९ गुण तर कमीत कमी १ गुण मिळाले आहेत. सरासरी २१.७४ इतकी आहे. पदार्थ विज्ञान या विषयात एकून २९३५ पैकी २८१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात सर्वाधिक ७० गुण तर कमीत कमी ९ गुण मिळाले आहेत. सरासरी २४.८६ इतकी आहे. गणित विषयात एकूण २१२९ पैकी २०३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात सर्वाधिक ७३ गुण तर कमीत कमी ९ गुण मिळाले. सरासरी २८.१७ इतकी आहे. (Exam)

प्रत्येक विषयातील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. भौतिकशास्त्र विषयात- प्रथम : आदित्य जगदीश भट (गुण ५९), व्दितीय : स्वतीत श्रीपादराव वालावलीकर (गुण ५८), तृतीय : जोशुआ जोस डायस बार्रेटो (गुण ५६), चौथा :निखिल भारत रजनी (गुण ५५), चौथा : हर्ष महेंद्र खांडेपारकर (गुण ५५) चौथा: अग्रजाह वर्धन भोबे (गुण ५५). पदार्थ विज्ञान या विषयात - प्रथम : साईराज राघवेंद्र घोसारवाडकर (गुण ७०), द्वितीय : अग्रजाह वर्धन भोबे (६९), द्वितीय : देवी मनोज तिंबले (६९), (devi Timble) चौथा : आयुष प्रभू (६८), चौथा : अभिदा ईशाना बार्रेटो (६८). गणित - प्रथम : स्वतीत श्रीपादराव वालावलीकर (७३), व्दितीय: जोशुआ जोस डायस बार्रेटो (७३), तृतीय: साईराज राघवेंद्र घोसारवाडकर (७३), चौथा : मनाली महेंद्र मांद्रेकर (७३), पाचवा: आयुष प्रभू (७२) आणि अखिल विष्णू नाईक (७२). (Akhil Naik) विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे कामत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत, गोवा इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. व्ही. एन. शेट, गोवा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. लोहानी,डॉ . दीपक गायतोंडे आणि साहाय्यक संचालक नीता नाईक (Nita Naik) उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT