Goa Natural Gas Pvt.Ltd Dainik Goamantak
गोवा

Gomantak Impact: फोंड्यात गॅसवाहिनी जाेडणीला 'अखेर' सुरुवात

Goa News: दैनिक गोमन्तक मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर गोवा नॅचरल गॅस कंपनीला जाग आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘फोंड्यात गॅसवाहिनी कधी पेटणार’ या शीर्षकाखाली 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना जाग आली असून त्यानंतर ते कामाला लागल्याचे दिसत आहे.

गेली तीन वर्षे संपर्क करण्याकरिता दिलेले क्रमांकही बंद असल्यामुळे लोकांच्या भीतीत अधिकच भर पडली होती. काहींकडून 500 रुपये तर काहींकडून दोन हजार ते साडेचार हजार रुपये एवढे पैसे घेऊनही त्यांना गॅस जोडणी देण्यात आली नव्हती. काहींच्या घरात मीटर बसविले असले तरी जोडणी नसल्यामुळे ते मीटर्स ‘शोपीस’ ठरले होते.

प्रसार माध्यमात विषय उपस्थित झाल्यानंतर आता गोवा नॅचरल गॅस कंपनीला जाग आली असून ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्या जोडणीची सद्यस्थिती काय यावर त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी त्यांनी गॅस लाईनच घातलेली नसल्याचे आढळून आले आहे. गॅस लाईन न ओढता घरात मीटर्स मात्र बसविले गेलेत.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्थितीची पाहणी केली असून लवकरच या ठिकाणी गॅस लाईन ओढली जाईल, असे संबंधित ग्राहकांना आश्‍वासन दिले आहे.

‘एकदाचे गंगेत घोडे न्हाले’

अजूनही फोंडा शहरातील काम पूर्ण झाले नसून काही ठिकाणी गॅस लाईनच ओढली नसल्यामुळे सगळ्या ग्राहकांना गॅस जोडणी मिळण्याकरिता कमीतकमी सहा महिने तरी जातील. परत एकदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून सगळ्यांना जरी नसली तरी काही ग्राहकांना आता जोडणी मिळणार आहे. त्यामुळे एकदाचे का होईना ‘गंगेत घोडे न्हाले’ असे म्हणायला काही हरकत नसावी हेच खरे.

रिया पारकर, शिक्षिका-फोंडा-

‘दै. गोमन्तक’मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर गोवा नॅचरल गॅस कंपनीकडून उरलेले 4000 रुपये भरा. तुम्हाला जोडणी देण्यात येईल, असा संदेश आला. त्यामुळे ही प्रक्रिया एकदाची का होईना; पण परत सुरू झाल्याचे प्रत्ययाला येत आहे. हे महत्त्वाचे वृत्त प्रसिध्द करून या कंपनीला जाग आणल्याबद्दल ‘दै. गोमन्तक’चे धन्यवाद! यापुढे अशीच जनजागृतीसंबंधीची वृत्ते प्रसिध्द करून आमच्यासारख्यांंना दिलासा द्यावा ही विनंती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT