Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

MLA Pravin Arlekar: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती केल्यास कारवाई

आमदार प्रवीण आर्लेकर: फोंड्यात सात्त्विक गणेशमूर्ती चित्रशाळेचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh idol plaster of paris राज्यात चिकणमाती तसेच साडूच्या गणेशमूर्तींना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे संकेत गोवा सरकारच्या हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले.

खडपाबांध - फोंड्यात आज आविष्कार कला केंद्र व गणेश कला केंद्राच्या सहकार्याने पर्यावरणपूरक सात्त्विक गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात आल्या असून या चित्रशाळेचे तसेच शेतकरी ढाबाचे उद्‍घाटन आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, शौनक बोरकर व आविष्कार कला केंद्राचे मनोज गावकर उपस्थित होते.

नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले, की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर राज्यात बंदी आणण्यात आली ही चांगली बाब आहे.

राज्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळवून देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात कला क्षेत्राचाही अंतर्भाव करण्यात आला आहे, त्यामुळे मुलांचे कलागुणही विकसीत होतील.

मूर्तिकारांना यंत्रे

गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी आहे. आपण जे आराध्य दैवत पूजतो, त्याची विसर्जनानंतर होणारी विटंबना रोखण्यासाठीच प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणण्यात आली असून चिकणमातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी गोव्यात मूर्तिकारांना प्रोत्साहनासाठी महामंडळातर्फे यंत्रे देण्यात आली आहेत.

राज्यात आत्तापर्यंत पन्नास यंत्रे वितरित करण्यात आली असून पुढील काळात ही संख्या वाढवून गोव्यातच मूर्ती तयार व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील आणि गोमंतकीय मूर्तिकारांना वाढीव अनुदान देण्यात येईल, असे आर्लेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT