Goa Ganesh Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Festival 2023: पत्रीचा गणपती, खऱ्या अर्थाने होतेय निसर्गपूजन! अजूनही जपली जातीय अनोखी परंपरा

पैंगीणच्या प्रभुगावकर कुटुंबीयांचा उत्सव

Kavya Powar

सुभाष महाले

कोकणात व गोव्यात गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी केली जाते.मात्र, प्रत्येक गणेश भक्त आपल्या परमप्रिय गणेशाला वेगवेगळ्या रूपांत व ढंगात भजत असतो.त्याच्या पूजनाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत.सर्वत्र चिकणमाती किंवा शाडूच्या गणेशमूर्तीचे पूजन केले जाते.मात्र, पैंगीण येथील महालवाडा येथील प्रभूगावकर कुटुंबीय पाना, फुलांत म्हणजे पत्रीत गणेश रूप पाहून पत्रीचा गणपती पूजतात.

या सर्व वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म आहेत.ही परंपरा अनेक वर्षाची असून हरितालिकेच्या पहिल्या दिवशी महालवाडा येथील डोंगरावर जाऊन प्रभूगावकर कुटुंबातील सदस्य एकवीस पत्रीची पाने आणून महालवाडा येथील श्री नृसिंह परशुराम देवालयात त्यांच्या गौरी व श्री गणपतीच्या अशा वेगवेगळ्या पुड्या बांधतात.

प्रभूगावकर कुटुंबीयांबरोबरच महालवाडा येथील वेळीप व अन्य कुटुंबीय नारळ ठेवून या पुड्या नेत असतात. प्राप्त माहितीप्रमाणे गेल्या तीन पिढ्यांपासून आजही या पत्रीच्या गणपतीची प्रथा प्रभूगावकर कुटुंबीयांत आहे,असे या वाड्यावरील ज्ञानानंद प्रभूगावकर यांनी सांगितले.

महालवाडा येथील तेरा प्रभूगावकर कुटुंबांमध्ये ही प्रथा आहे. असे महालवाडा येथील आर्किटेक्ट योगेश प्रभूगावकर यांनी सांगितले. गौरी महादेव व श्री गणपतीच्या पुडीचे यथासांग पूजन केल्यानंतर पंचमीला गौरी-महादेव श्री गणपतीच्या चित्रासहीत पुडीचे विसर्जन करण्यासाठी विहिरीवर ती नेण्यात येतात त्या नंतर विहिरीचे पाणी काढून आंब्याच्या पानाच्या डहाळीने ते पाणी चित्रावर शिंपडण्यात येते.

त्यानंतर गणपतीच्या पत्रीची पुडी उघडून त्यातील सर्व औषधी वनस्पतीचे विसर्जन विहीरीच्या पाण्यात सोडले जाते.त्याचप्रमाणे गौरी- महादेवाची पुडी उघडून नारळासहीत ही पुडी विहिरी जवळच्या झाडा खाली त्यांचे विसर्जन केले जाते प्रभूगावकर कुटूंबीयाकडून ही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने निसर्गाची पुजा करण्यात येत असल्याचे योगेश प्रभूगावकर यांनी सांगितले.

दडपशाहीचा परिणाम...

पोर्तुगीजांच्या राजवटीत त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता.त्यात प्रभूगावकर कुटुंबातील काही सदस्य गोवा मुक्ती लढ्यात सक्रिय असल्याने पोर्तुगीजांची या कुटुबीयांवर करडी आणि वाकडी नजर होती.

अशा स्थितीत घरांत गणेश चतुर्थी असताना त्यांनी घरात घुसून गोंधळ घालू नये, यासाठी लोखंडी पेटीच्या वरच्या भागात महादेव, गौरी व श्री गणेशाची चित्रे चिकटवण्यात येत होती. ही चित्रे घरांतील मंडळीच काढत.

बाकी सर्व साहित्य पेटीत ठेवायचे या मागे हेतू एवढाच की, कोणी पोर्तुगीज सैनिक घरात घुसल्यास पेटीचे वरचे झाकण तात्काळ बंद करता यावे. त्यामुळे गणेश पूजनाचा थांगपत्ता त्यांना लागत नसे, त्या नंतर ही प्रथा चालू राहून गोवा मुक्तीनंतर घरात उघड्यावर मूर्ती पूजा करू लागले.मात्र, पत्रीच्या गणपतीची प्रथा आजही कित्येक पिढ्या चालू असल्याचे आमचे पूर्वज सांगतात, असे योगेश प्रभूगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT