Congress workers protest Dainik Gomantak
गोवा

Goa: गांधी जयंतीदिनी खड्डयांवर झोपून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध

अस्नोडा पुलावरील खड्डयांवरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

दैनिक गोमन्तक

डिचोली: अस्नोडा पुलावर (Assonora bridge) पडलेल्या खड्डयांवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress workers protest) अचानक आक्रमक पवित्रा घेत काल गांधी जयंतीदिनी (Goa Gandhi Jayanti:) खड्डयांवर झोपून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसचे डिचोलीतील कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. दरम्यान, रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी काँग्रेसचे कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत आणि नझीर बेग यांना अटक केली. नंतर त्यांची दुपारी त्यांची सुटका केली.

पुलावरील रस्ता 'खिळखिळा'

अस्नोडा पुलावरील रस्त्याची दिवसेंदिवस अत्यंत दयनीय अवस्था होत आहे. पारकडील बाजूने पुलाला जोडलेल्या रस्त्यावर लहानमोठे खड्डे पडून हा रस्ता पूर्णपणे खिळखिळा बनलेला आहे. त्यामुळे पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांना कठीण दिव्य पार करावे लागत आहे. या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात 30 हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

म्हणूनच आंदोलन

मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून ही समस्या आहे. गेल्या 14 जुलै रोजी मेघ:श्याम राऊत आणि अन्य कार्यकर्त्यांनी पुलावरील खड्डयांकडे लक्ष वेधताना आंदोलनाचा इशारा दिला होता. तर गेल्याच महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी खड्डयांकडे लक्ष वेधण्यासाठी या पुलावर कोणीतरी पंतप्रधान श्री. मोदी यांच्या छायाचित्रासह टीकात्मक फलक लावला होता. मात्र पुलावरील खड्डेमय रस्त्याची डागडुजी करण्याकडे संबंधितांचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. यामुळे सरकारचा निषेध करीत काँग्रेस कार्यकर्ते आज (शनिवारी) आक्रमक होऊन अचानक रस्त्यावर उतरले.

कार्यकर्ते खड्डयात झोपले

कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताना हातात फलक घेवून सरकारच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. नंतर मेघ:श्याम राऊत, नझीर बेग आणि अन्य एका कार्यकर्त्याने पुलावरील खड्डयात झोपून काहीवेळ वाहतुकीस अडथळा निर्माण केला. यावेळी विशाल मांद्रेकर, बालाखान गोरी आदी 30 हून कार्यकर्ते उपस्थित होते. डिचोली पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी रस्त्यावर झोपलेल्या मेघ:श्याम राऊत आणि नझीर बेग यांना ताब्यात घेतले. दोघांही विरोधात भादंसंच्या 151 कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. नंतर दोघांनाही उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर उभे करुन त्यांना सोडण्यात आले.

तर तीव्र आंदोलन

यावेळी मेघ:श्याम राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका करताना सरकारला जनतेचे काहीच पडलेले नाही. सरकार जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला. रस्त्याची वेळीच डागडुजी केली नाही, तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही मेघ:श्याम राऊत यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT