Goa Foundation | Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Foundation: गोवा सरकारने अजून धोरण जाहीर केले नसतानाही; खाण लिलाव सुरु!

Goa Foundation: खाण लिलाव धोरण नियमानुसार होत नाही, तोपर्यंत खाणी सुरु करु नये, अशी मागणी गोवा फाऊंडेशन केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Foundation: राज्य सरकारने 4 खाण ब्लॉक्सच्या ई-लिलावासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार सरकारने खाण धोरण अजूनही जाहीर केलेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया खाण धोरण तसेच एमएमडीआर कायदा नियमानुसार पारदर्शकपणे झाली नसल्याचा दावा गोवा फाउंडेशनने केला आहे.

खाण व्यवसायासंदर्भात सरकारचे कोणतेही धोरण नाही. 2016 मध्ये सरकारने अधिसूचना जारी करून खाणपट्ट्यांना देण्यात येणारा निधी मागे घेतला आहे. आजपर्यंत हे धोरण जाहीर न करताच सरकारने गोवा खनिज विकास महामंडळ स्थापन करून जुन्या खाणपट्ट्यांचाही ई-लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू करताना सरकारने लोकांकडून सूचना तसेच सल्ला मागितला नाही.

तसेच, या लिलावामुळे राज्यावर होणारा परिणाम तसेच जनतेचे नुकसान याचा विचार करण्यात आलेला नाही. या खाण लिलावाबाबत खाण खात्याकडून माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली तरी ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

या खाणपट्ट्यांचा लिलावासंदर्भातची माहिती पारदर्शक असल्याशिवाय या खाणी पुन्हा सुरू करण्यात येऊ नयेत, अशी मागणी गोवा फाऊंडेशनचे संशोधन संचालक राहुल बासू यांनी केली आहे. आम्ही सरकारला अनेक पत्रे लिहिली आहेत, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही असेही बासू यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT