Vijay Sardesai Dainik gomantak
गोवा

Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्ष निवड प्रक्रियेला गोवा फॉरवर्ड देणार न्यायालयात आव्हान

निवड प्रक्रिया 12 ऑक्‍टोबरला होण्याची शक्‍यता; विरोधकांकडून सरकारवर टीका

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Mayor Election : पालिका नगराध्यक्षांची निवड खुल्या पद्धतीने म्हणजेच हात उंचावून केली जावी, यासाठी सरकार नवीन वटहुकूम जारी करू पाहात असले तरी असा वटहुकूम आल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्ड पक्षाने सुरू केली होती. रात्री उशिरा राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी या वटहुकुमाला मंजुरी दिली. त्याची अधिसूचनाही जारी केल्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई कोणती भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्‍यातील पालिकांमध्‍ये यापुढे नगराध्‍यक्ष, उपनगराध्‍यक्ष निवड ही खुल्‍या पद्धतीनेही (हात उंचावून) होऊ शकणार आहे. त्‍या संदर्भात पालिका प्रशासनाने काढलेल्‍या वटहुकुमाला राज्‍यपाल पी. एस. श्रीधरन पिल्‍लई यांनी गुरुवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. त्‍यानंतर कायदा खात्‍याने त्‍याची अधिसूचनाही जारी केली आहे. परिणामी मडगाव पालिका नगराध्‍यक्ष निवड ही खुल्‍या पद्धतीने होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही निवडणूक बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहितीही खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

मडगाव पालिकेवर ताबा मिळविण्यासाठी हात दाखवून मतदान करणारा नियम लागू करण्यासाठी सरकारने वटहुकूम काढला आहे. त्‍याला सर्व स्‍तरांतून विरोध होत आहे. हा वटहुकूम म्हणजे लोकशाही तत्त्वांचा खून असून, त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. या वटहुकुमाचा प्रभाव अन्य ठिकाणीही पडून स्थानिक संस्थांच्या अधिकारावर त्याद्वारे घाला घालण्याचा प्रयत्न केला जाण्याचा धोका आहे, असा निशाणा गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी साधला आहे.

आम्ही त्यांना मतदान का करावे?

यासंदर्भात भाजप नगरसेवकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, दिगंबर कामत हे जरी भाजपमध्ये सामील झाले असले तरी त्यांचे समर्थक नगरसेवक अजूनही काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना मतदान का करावे, असे एका गटाचे म्हणणे आहे, तर दुसऱ्या गटाकडून मूळ भाजप नगरसेवकाच्या नावाचाच या पदासाठी विचार व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

निवडणूक लढवण्यात अर्थ नाही

गोवा फॉरवर्ड गटाने यापूर्वी पाठिंबा दिलेले नगरसेवक घनःश्याम शिरोडकर यांना याबद्दल विचारले असता, आता वटहुकूम काढला गेला आहे. हात उंचावून मतदान होऊ शकणार असल्‍याने निवडणूक लढवण्यात काहीच अर्थ नाही, अशी भावना आमच्या समर्थक नगरसेवकांची झाली आहे, असे ते म्हणाले.

ताकही फुंकून प्‍यावे...

मडगाव पालिकेत सत्ता मिळवण्‍यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. तथापि, नगरसेवकांकडून विश्‍‍वासघात झाल्‍याने यावेळी ‘ताकही फुंकून प्‍यावे’, अशी भूमिका घेण्‍यात आली. त्‍यातूनच असा वटहुकूम जारी केला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर कायद्याच्‍या चौकटीतच सर्व प्रक्रिया होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT