vijay sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa University: ''गोवा विद्यापीठातील ती पदे भरु देणार नाही, कुलगुरुंनी अद्याप...''; सरदेसाईंच्या पक्षाचा आक्रमक पवित्रा

Goa Forward Party: गोवा विद्यापीठात रिमोट सेन्सिस आणि जीआयएस अभ्यासक्रमासाठी जाहिरात करण्यात आलेल्या पदांबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

गोवा विद्यापीठात रिमोट सेन्सिस आणि जीआयएस अभ्यासक्रमासाठी जाहिरात करण्यात आलेल्या पदांबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. या पदांबाबत कुलगुरुंनी अद्याप समाधानकारक उत्तरे दिले नसल्याचे पक्षाच्या वतीने आज (21 ऑक्टोबर) सांगण्यात आले. जोपर्यंत आम्हाला कुलगुरुंकडून आपेक्षित उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत ही पदे भरु देणार नसल्याचे पक्षाचे नेते प्रशांत नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषद घेवून हा इशारा दिला.

भरती प्रक्रियेला विरोध

दरम्यान, आम्ही या पदांच्या भरतीला याआगोदर विरोध केला होता. आज (21 ऑक्टोबर) आम्ही कुलगुरुंना भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. आरक्षित पदे का काढण्यात आली, पंधरा वर्षे रहिवाशी असण्याची अट का शिथिल करण्यात आली? असे सवाल आम्ही त्यांना यावेळी केले. मात्र कुलगुरुंना आमच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा विद्यापीठाकडून (Goa University) अद्याप अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला नाहीये.

आंदोलनाचा इशारा

नाईक पुढे म्हणाले की, कुलगुरुंनी आमच्या प्रश्नांची तात्काळ उत्तरे द्यावीत अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करु. विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपालांनी यासंबंधी दखल घ्यावी. आम्हाला विद्यापीठाकडून योग्य प्रतिसाद नाही मिळाला तर आम्ही राज्यपालांची भेट घेवून त्यांच्या समोर हे प्रकरण मांडू. गोवा विद्यापीठात गोमंतकीयांना प्राधान्य देण्यात येईल असे दिक्षांत समारंभात बोलताना सांगितले होते. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना वगळून खप्पा मर्जी असलेल्या लोकांनाच नोकरीसाठी प्राध्यन्य क्रम दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT