covid warrior.jpg
covid warrior.jpg 
गोवा

"गोवा सरकारने कोरोना योद्ध्यांची फसवणूक केली"

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोनाकाळात कोरोना योद्ध्यांची (Covid 19 Warrior) भूमिका बजावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 20 टक्के जादा वेतनात वाढ देण्याची घोषणा सरकारने केली असली, तरी त्याला सरकारकडून मान्यता देण्यात आली नसल्याचे माहिती हक्क कायद्याखाली (RTI) उघड झाली आहे. या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांची फसवणूक चालविली आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड (Goa Forward Part) पक्षाने केला आहे. (Goa Forward Party has accused the Goa government of betraying the Covid19 warriors) 

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले की, सरकारने कोविड संबंधित कोरोना योद्धे व प्रशासकीय तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात जादा 20 टक्के वाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. मात्र, या घोषणेनंतर आवश्‍यक असलेली प्रक्रिया त्यांनी केली नव्हती, असे उघड झाल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

तिसऱ्या लाटेबाबत सज्जता नाहीच
राज्यात अजूनही कोरोना संसर्ग आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाटेचे प्रमाण कमी झाले असले तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सरकारने मडगाव येथील ‘ईएसआय’ कोविड इस्पितळाची अधिसूचना रद्द केली आहे. यावरून सरकारचे प्रशासन तळागाळाला गेल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT