कॉंग्रेस आणि भाजपचे निवडणूक चिन्ह Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "घोटाळा लपविण्यासाठी उर्फान मुल्ला भाजपमध्ये"

गोवा फॉरवर्डचा (Goa Forward PArty) आरोप, शिक्षक नेमणुकीच्या चौकशीची (Probe) मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: मडगावातील (Margao) हुस्न सहारा मेडियम स्कूल व अंजुमन इस्तामिन मुस्लोमिन स्कूलमध्ये शिक्षकांची नेमणूक पात्र नसतानाही केली असून त्याची चौकशी दक्षता खात्याकडे देण्यात आली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश होऊ नये व चौकशीतून सुटका करून घेण्यासाठी उर्फान मुल्ला यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) करून शाळांमधील शिक्षक नेमणूक प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

पणजीत (Panjim) घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते जॉन नाझारेथ म्हणाले, की भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता नसलेल्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक हायस्कूलच्या प्राचार्य त्यांच्या पत्नी आहेत. ते दोन्ही शैक्षणिक संस्थांचे अध्यक्षही आहेत. 23 जून 2020 रोजी तत्कालिन शिक्षण संचालक वंदना राव यांनी या शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांकडे तक्रार दिली होती व त्याची चौकशी करण्याची विनंती केली होती. पात्र नसताना बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षकांना नेमून सरकारच्या निधीचा घोटाळा केल्याचे त्यांनी म्हटले होते व त्या शिक्षकांना काढण्यात यावे अशी शिफारस केली होती.

6 जून 2019 रोजी उर्फान मुल्ला हे शिक्षण संचालक कार्यालयात काही फाईल्सच्या तपासणीस गेले होते. फाईल्सची तपासणी करत असताना त्यांनी त्यातील काही दस्ताऐवजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करताना तेथील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांना फाईल्स तपासणीस रोखण्यात आले होते. या झाल्या प्रकाराची नोंद संबंधित अधिकाऱ्याने फाईलवर लिहिली होती. सरकारी दस्ताऐवज छेडछाडप्रकरणी त्याच्याविरुद्ध फौजदारीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. जर भाजपला उच्च नैतिकता असल्यास भाजप प्रवक्ता उर्फान मुल्ला याच्याविरुद्ध कारवाई करावी व या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे नाझारेथ म्हणाले. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांची युती झाल्यास आगामी विधानसभेत युतीचे सरकार सत्तेवर येईल याची उर्फान मुल्ला यांना भीती असल्याचेही नाझारेथ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT