Goa Forward Party Election  Dainik Gomantak
गोवा

Goa: सांत आंद्रेत मूलभूत सुविधांचा अभाव

सरदेसाई : गोवा फॉरवर्डच्या दौऱ्यास प्रारंभ : स्थानिक आमदारांचा स्वार्थासाठी भाजप प्रवेश

Dhananjay Patil

पणजी : राजकीय पक्षांनी निवडणूकपूर्व मतदारसंघ दौरे सुरू केले आहेत. (Goa Forward) गोवा फॉरवर्ड पक्षाने आज सांत आंद्रे (Sant Andre) मतदारसंघातून दौरा सुरू केला. त्यामुळे सहा महिने आधीच निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. सरकारने गोवा हे हागणदारीमुक्त राज्य घोषित केले असले तरी अजूनही सांत आंद्रे मतदारसंघात लोकांना उघड्यावर शौचास जावे लागते. विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेले स्थानिक आमदार लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले. हा मतदारसंघ विकासात मागे राहिल्याची टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केली. आगशी येथील श्री चामुंडेश्‍वरी मंदिरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देवीचे दर्शन घेऊन दौऱ्यास प्रारंभ केला. यावेळी सरदेसाई यांनी लोकांचे म्हणणे ऐकले. त्यांच्यासोबत जगदीश भोबे, कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस (संघटना) दुर्गादास कामत, (Durgadas Kamat) सहसचिव जॉन नाझारेथ आणि इतर नेते उपस्थित होते.

सांत आंद्रे (Sant Andre) हे गोव्याचे वारसा स्थळ असूनही येथे मूलभूत सुविधा नाहीत. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे ते नोकरीच्या शोधात स्थलांतर करत आहेत. हा मतदारसंघ, जो फुटबॉलसाठी ओळखला जातो, तिथे चांगली मैदानेही नाहीत. ज्येष्ठ लोकांनाही सुविधा देण्यात आमदार अपयशी ठरले आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली. (Vijay Sardesai) मतदारसंघांचा दौरा करणाऱ्या भाजप नेत्यांचा सत्कार केला जात आहे, यावरून असे दिसते की गोव्याचे मतदार त्यांना निरोप देत आहेत, असा टोलाही सरदेसाई यांनी हाणला. भाजप पुढील निवडणुकीत एक अंकी संख्येवर येईल. संघटित नसलेले विरोधक व काही व्यक्तींमुळे ते जेमतेम दहापर्यंत पोहचू शकतात. येत्या गणेश चतुर्थीपर्यंत समविचारी राजकीय पक्षांनी युतीबाबत निर्णय घेणे शहाणपण आहे. जर तसे झाले नाही तर त्यांच्या डोक्यात कोणते विचार आहेत हे आम्हालाही कळेल. आम्ही २०२२ ची विधानसभा निवडणूक लढविण्यास तयारी करतो आहोत, असे सरदेसाई (Vijay Sardesai)म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT