राजकीय नेत्यांनी अतिरिक्त पंचायत संचालक उमाकांत कारकोणकर यांना गुरुवारी घेराव घातला Dainik Gomantak
गोवा

Goa: राजकीय नेत्यांनी अतिरिक्त पंचायत संचालकांना घातला घेराव

शिरदोन-पाळे सरपंचांवर अविश्‍वास. आमदारांच्या हस्तक्षेपामुळे नाट्यमय कलाटणी

दैनिक गोमन्तक

पणजी: शिरदोन-पाळेचे सरपंच जगदीश गावस (Goa) यांच्याविरुद्धचा ठराव संमत झाल्यानंतरही ही प्रक्रिया बेकायेशीर असल्याचा निष्कर्ष काढून तो रद्द केल्याच्या निषेधार्थ राजकीय नेत्यांनी अतिरिक्त पंचायत संचालक उमाकांत कारकोणकर यांना गुरुवारी घेराव घातला. (Sarpanch) ही लोकशाहीची क्रूर थट्टा असल्याचे आरोप त्यांनी केला.

या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. घेराव घातलेल्यांमध्ये गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) उपाध्यक्ष दुर्गादास कामत, जगदीश भोबे तसेच रामा काणकोणकर, रामराव वाघ, टोनी फर्नांडिस यांचा समावेश होता. त्यांनी हे प्रकरण पंचायत सचिवांकडे मांडले असून त्यांनी त्यासंदर्भातील अहवाल मागितला आहे. यावेळी दुर्गादास कामत (Durgadas Kamat) म्हणाले की, भाजप सरकारकडून लोकशाहीची हत्या केली जात आहे.

सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे या प्रकरणामागे आहेत. पंचायत अधिकाऱ्यांना धमकावून त्यांनी हा ठराव रद्द करण्यास भाग पाडले, असा आरोप कामत यांनी केला. अतिरिक्त पंचायत संचालकांकडे कुश पालकर आणि जगदीश गावस (Jagdish Gawas) यांनी अविश्‍वास ठरावाविरोधात अर्ज केला होता. या ठरावाची प्रक्रिया पूर्ण न होताच तो संमत करण्यात आला, तसेच निवडणूक निरीक्षकाची ठरावाच्या अहवालावर सही नसल्याचा दावा केला होता.

या अर्जावर एकतर्फी सुनावणी घेऊन हा ठराव रद्द केला. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांच्या कार्यालयाला धडक दिली. (Goa Forward) एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश जारी कसा केला, असा प्रश्‍न त्यांनी केला. अविश्‍वास ठरावादिवशी पंचायत कार्यालयाची (Goa) कुलुपे तोडल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेथे बैठक घेण्यास परवानगी नाकारली. (Shirdon Pale) त्यामुळे ही बैठक कार्यालयाबाहेरच घेतली.

ही बैठक होऊ नये म्हणून स्थानिक आमदारांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणून त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सफल झाला नाही. त्यामुळे पंचायत अधिकाऱ्यांना धमकी देऊन हा ठराव रद्द केला. बैठकीच्या दिवशी विधानसभेत (Goa Assembly) मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पोलिस हस्तक्षेप किंवा अडथळा आणणार नाही. ती नियमानुसारच होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदार बेकायदेशीरपणे ही पंचायत आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे स्थानिक लोक संतापले असून येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार केला आहे, असे जगदीश भोबे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT