Durgadas Kamat Dainik Gomantak
गोवा

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांबाबत गोवा फॉरवर्ड आक्रमक

निलंबित करण्याची मागणी; गोमंतकच्या मोहिमेचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत

दैनिक गोमन्तक

Kare Law College Row: आपल्या मुलाला बीए एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी सगळी प्रवेश पद्धतीच बदलून अनेक विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळणारे कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा डा सिल्वा यांना ताबडतोब निलंबित करा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. दरम्यान 'दै. गोमंतक' ने हा पोलखोल करण्याची मोहीम हाती घेतली असून तिचे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेकांनी स्वागत केले आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी आज गोमंतक ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत केलेल्या ट्विटमध्ये, कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या या कृतीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असे म्हणत, ही चौकशी होईपर्यंत या प्राचार्याला या पदापासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी जे कृत्य केले आहे ते विद्यार्थ्याच्या भल्याचे नव्हे अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी प्राचार्य डा सिल्वा यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गोवा शिक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे जर कुठ्ल्याही शिक्षकाचा आप्त जर परिक्षा देत असेल तर त्या शिक्षकाने स्वतःला परीक्षा प्रक्रियेपासून दूर ठेवले पाहिजे.

Goa Forward Party

मात्र या प्रकरणात डॉ. डा सिल्वा यांनी आपला पुत्र परिक्षा देत असताना त्या परीक्षेचे पेपर स्वतःच्या महाविद्यालयातील शिक्षकाकडून तयार करून घेतले एव्हढेच नव्हे तर ते तपासलेही त्यांनीच. हा कायद्याचा सरळ सरळ भंग असून अशा व्यक्तीवर कारवाई ही झालीच पाहिजे अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. या प्रकरणाचा एका आठवड्यात सोक्षमोक्ष लागला नाही तर आम्ही आमची पुढील कृती करू असेही त्यांनी सांगितले.

काल चौधरी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाचे कुलसचिव वी. एस. नाडकर्णी यांची भेट घेऊन त्यांना याविषयी जाब विचारला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT