Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News: जनतेला माहिती पुरविण्यासाठी कलाकार म्‍हणून काम केल्यास तो गुन्हा कसा?- गुदिन्हो

विकास भगत : काणकोणात व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच मूलभूत अधिकारांवर गदा

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News सत्ताधाऱ्यांनी कितीही खटले, तक्रारी दाखल केल्या तरी सकारात्मक विरोधी भूमिका बजावण्यासाठी 100 युवकांची फळी तयार करणार असल्याचे गोवा फॉर्वडचे विकास भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काणकोणच्या वेगवेगळ्या विषयांवर समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्याप्रकरणी काँग्रेसचे चेतन भंडारी व आर्टिस्ट लॉयड गुदिन्हो यांच्याविरोधात सभापती रमेश तवडकर यांचे ओएसडी बोरकर यांनी काणकोण पोलिस तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

भारतात जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या अमेरिका भेटीत ठासून सांगितले आहे. लोकशाहीत व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच विचार व्यक्त करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.

असे असताना काणकोणात त्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून युवकांचा व कलाकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काणकोणची जनता हे सहन करणार नाही, असे भगत म्‍हणाले.

कलाकारांची सतावणूक : लॉयड

लॉयड गुदिन्हो यांनी सांगितले की, मी एक आर्टिस्ट आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मला आहे. मात्र जनतेला माहिती पुरविण्यासाठी समाजमाध्यमांवर कलाकार म्‍हणून काम केल्यास तो गुन्हा कसा काय ठरू शकतो?

पोलिसांना सर्व माहिती दिली आहे. आता 4 जुलैला काणकोणच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. हा माझ्यासारख्या कलाकारला सतावण्याचा प्रकार आहे.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. मात्र काणकोणात त्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून युवकांचा व कलाकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काणकोणची जनता हे कोणत्‍याही परिस्‍थितीत सहन करणार नाही.

- विकास भगत, गोवा फॉर्वडचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT