Atishi Marlena Goa Visit Dainik Gomantak
गोवा

Atishi Marlena Goa Visit: दिल्‍लीच्‍या माजी मुख्‍यमंत्री आतिषी गोवा दौऱ्यावर; 'आप'च्‍या कार्यालयाचं करणार उद्‍घाटन

Delhi Former CM Atishi Marlena: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी या १० मार्च रोजी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

Sameer Amunekar

मडगाव: गोव्यात आम आदमी पक्षाचा (AAP) विस्तार करण्यासाठी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी या १० मार्च रोजी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

आतिषी या दौऱ्यादरम्यान त्या दक्षिण गोव्यातील 'आप'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत.

तसंच सोमवारी सायंकाळी ५ वाजता नावेली येथील ‘‍ब्‍ल्‍यू बेल बिल्‍डिंग’ प्रकल्‍पात ‘आप’च्‍या या कार्यालयाचं उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

आम आदमी पक्षानं गोव्यात आपली उपस्थिती वाढवण्याचे ठरवले असून, या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर चर्चा केली जाणार आहे.

आतिषी यांच्या भेटीमुळे गोव्यात 'आप'च्या राजकीय हालचालींना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT