Swami Vivekananda Smriti Sangh Dainik Gomantak
गोवा

Goa: झाडे जतन केल्यास वन महोत्सव सफल बनेल- शिवाजी गाड

असे उदगार केरी सत्तरी (Keri Sattari) येथील स्वामी विवेकानंद स्मृती संघ (Swami Vivekananda Smriti Sangh) शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजी गाड (Shivaji Gad) यांनी काढले.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी ठिकठिकाणी साजरे होणारे वनमहोत्सव हे प्रातिनिधीक असतात. वनमहोत्सवाच्या निमित्ताने नवीन रोपटी लावली जातात, वितरीत केली जातात. यातून समाज जागरुक होतो. निदान त्या निमित्ताने का असेन आपण झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देतो. परंतू वनमहोत्सवाच्या निमित्ताने वितरीत केलेली किंवा लावलेली झाडे जर येणाऱ्या काळात जगली तरच वन महोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल असे उदगार केरी सत्तरी (Keri Sattari) येथील स्वामी विवेकानंद स्मृती संघ (Swami Vivekananda Smriti Sangh) शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजी गाड (Shivaji Gad) यांनी काढले.

स्वामी विवेकानंद स्मृती संघ शिक्षण संस्थेच्या विवेकानंद विद्या मंदिर प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या वन महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष याह्या  करोल, माजी अध्यक्ष नामदेव गावस, विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कुलचे प्रभारी मुख्याध्यापक गोपिनाथ गावस, शिक्षक अर्जून गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना विषयक सर्व सरकारी नियमांचे पालन करीत विवेकानंद विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांना रोपटी देण्यात आली. यावेळी गोवा वनखात्याच्या केरी सत्तरी येथील रोपवाटिकेमधून जांभळ, कोकम, चिंच, आवळा, बाहवा, पेरू, लिंबू, बोर, आदीची रोपटी देण्यात आली होती. 

याप्रसंगी गोपीनाथ गावस यांचे समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका अनिषा सावंत यांनी केले तर  शिक्षिका सुनंती झोरे यांनी आभार मानले. कार्यक्रम  यशस्वी होण्यास जयेंद्र केरकर, सुहानी गावस यांनी सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT