पणजी: गोव्याच्या वन विभागाने जखमी पक्षी आणि प्राण्यांच्या त्वरित बचाव आणि पुनर्वसनासाठी ‘प्राण-रेखा’ या नवकल्पनात्मक ॲपचे अनावरण करण्यात आल्याने पक्षांच्या मदतीसाठी नवा मार्ग खुला झाला आहे.वनमंत्री विश्वजीत राणे यांनी या ॲपचा वापर करून लोकांना पक्षांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
राणे म्हणाले की, पशुपक्ष्यांनाही वेदना असतात, जगण्याचा भय असतो त्यासाठी त्यांची काळजी करण्याची गरज असते. हे ॲप त्यांच्यासाठी आवाज ठरणार आहे. नागरिकांनी संकटात असलेल्या वन्यजीवांची माहिती त्वरित नोंदवावी, जेणेकरून वन विभाग आणि बचाव पथक योग्य वेळी मदत करू शकेल, असे ते म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, गोव्यातील (Goa) जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल. नागरिकांच्या सहकार्याने प्रत्येक जीव वाचवण्याचा हा उपक्रम अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
गोव्याच्या पर्यावरणपूरक (Environment) दृष्टिकोनात ‘प्राण-रेखा’ एक नवा अध्याय ठरणार आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.