Goa Fishermen Dainik Gomantak
गोवा

Goa Fishermen : खवळलेल्‍या दर्यामुळे स्‍थानिक मच्‍छीमारांची निराशा

Goa Fishermen : एरव्‍ही शंभर रुपये किलो या भावाने कोळंबी विकली जाते. मात्र आजचा भाव ८० रुपये होता, असे त्‍यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, गाेव्‍यातील मासेमारी बंदी उठण्‍यासाठी अजून दाेन दिवस बाकी असले तरी लहान बाेटी घेऊन दर्यात जाऊन स्‍थानिक मच्‍छीमारांनी आजपासून मासेमारी सुरु केली.

मात्र पहिल्‍या दिवशी फक्‍त ४०० किलाे काेळंबीच जाळ्‍यात सापडली, अशी माहिती स्‍थानिक मच्‍छीमारांनी दिली. कोलव्‍यातून सुमारे २२ मच्‍छीमारी बाेटी मासेमारीसाठी पाण्‍यात उतरल्‍या होत्‍या.

आजचा दिवस आमच्‍यासाठी निराशाजनक होता. दर्या खवळलेला असल्‍यामुळे आम्‍हाला फारसे मासे मिळाले नाहीत. त्‍याशिवाय आज कोळंबीला दरही कमी हाेता.

एरव्‍ही शंभर रुपये किलो या भावाने कोळंबी विकली जाते. मात्र आजचा भाव ८० रुपये होता, असे त्‍यांनी सांगितले. हे मासे प्रक्रियेसाठी कारखान्‍यात पाठविले जातात. मात्र तिथेही दर कमी मिळत असल्‍यामुळे केरळमधून आता गोव्‍यात कोळंबी पाठविली, जाते असे या मच्‍छीमारांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT