Goa Illegal Fishing  Dainik Gomantak
गोवा

Illegal Fishing: गोव्यात कर्नाटकच्या मच्छीमारांच्या घुसखोरीचा वाद चिघळला; 'कारवाई करा अन्यथा....', सरकारला इशारा

Goa Fishing: त्रस्त मच्छिमाराचे सरकारविरुद्ध बंड, जलद कारवाई करण्याचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Fishing in Goa Latest Update

काही दिवसांपूर्वी मलपे-कर्नाटक येथील सुमारे 300 ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत घुसून बेकायदेशीर मासेमारी करीत होते. या बेसुमार मासेमारीमुळे स्थानिकांनी मासे मिळत नसल्याने त्रस्त होऊन त्यांनी सरकारला यावर मार्ग काढावा अशी विनवणी केली होती.

याच संदर्भात पेले नामक एका मच्छिमाऱ्याने आज सरकार विरुद्ध वेगळेच बंड पुकारले. भर बाजारात स्वतःचे कपडे काढत त्याने गोव्यातील मच्छीमाऱ्यांची परिस्थिती सांगितली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, "गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात मलप्यातील ट्रॉलर्सकडून बेकायदेशी मासेमारी सुरु आहे, अनेकवेळा विनवण्या करून यावर पक्का निर्णय घेतला जात नाही. आम्ही याच वेशात ऊन आणि पावसाचा सामना करत मासेमारी करतो, आणि आता सुद्धा जर का सरकारने कार्यवाही केली नाही तर आम्ही जीव द्यायला सुद्धा मागे बघणार नाही."

मलपे येथील ट्रॉलर्सना मलपे, होन्नावर, मंगळूर आणि कारवार इथे मासेमारी करण्यावर बंदी आहे आणि या ठिकाणी मासेमारी केल्यास त्यांना शिक्षा केली जाते,म्हणूनच हे ट्रॉलर्स गोव्याच्या हद्दीत घुसुन बेकायदशीर मासेमारी करीत असल्याचा आरोप स्थानिक मासेमाऱ्यांकडून केला जातोय. अनेकवेळा ही बाब समोर आणून सुद्धा सरकारकडून आवश्यक कार्यवाही केली जात नसल्याने गोव्यातील मासेमारी संतत्प झालेत.

सोमवारी (दि. 23 सप्टेंबर) रोजी वास्को मच्छीमाऱ्यांनी पर्वरीत गोव्याचे मच्छिमारमंत्री नीलकंठ हळर्णकर यांची भेट घेतली होती आणि दरम्यान राज्याबाहेरील बोटी गोव्यातील समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि कायमस्वरूपी यंत्रणा नसल्याने तात्पुरती यंत्रणा सुरु केली जातील असे आश्वासन मच्छिमारमंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT