Goa Fish Market Daink Gomantak
गोवा

Goa Fish Market: गोवा मत्स्यप्रेमींना यंदा माशांचे दर परवडणारे..शंभर रुपयांना 10 बांगडे, इसवण 500 रुपये किलो

Goa Fish Market: गोव्यातील ग्रामीण भागात बांगडे शंभर रुपयांना 8 ते 10 नग असा दर सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Fish Market: मत्स्यप्रेमींना यंदा मुबलक प्रमाणात आणि वाजवी दरात माशांवर ताव मारता आला, परंतु आता हळूहळू मत्सप्रेमींना मासळी खरेदी करताना विचार करावा लागत आहे. गेल्या महिन्यात शंभर रूपयांना पंधरा ते वीस बांगडे मिळत होते. मात्र आता 7 ते 10 मिळू लागले आहेत. असे असले तरी सध्याचा मासळीचा दर सर्वसामान्यांना परवडेल असाच आहे.

महिन्याभरापूर्वी बांगडा मासा किती खाऊ आणि किती नको असे झाले होते. मत्सप्रेमींना ती एक पर्वणीच ठरली होती मात्र आता दरात वाढ होत आहे. आता थोडा दर वाढत असला तरी गेल्या आठवड्यात 100 रुपयांना बारा ते पंधरा बांगडे विकले जात होते. मोठ्या आकाराचे बांगडे आज 150 रुपये प्रतिकिलो तर मध्यम आकाराचे बांगडे 100 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते.

गोव्यातील ग्रामीण भागात हेच बांगडे शंभर रुपयांना 8 ते 10 नग अशी विक्री सुरू आहे. मासळी बाजारात मुबलक प्रमाणात मासळी होती. यात प्रामुख्याने बांगडे व तारले मासे अधिक होते. तसेच कर्ली, समुद्री खेकडे, सुंगटे, इसवण, लेपो, माणकी आदी मासळीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होती.

ग्रामीण भागात मासळी महाग

राज्यातील ग्रामीण भागात शहरातून मासळी पुरविली जाते. यासाठी अनेक विक्रेते शहरातून दुचाकी किंवा चारचाकी गाडीतून मासळी विक्रीसाठी जात असतात त्यामुळे त्यांना वाहनाचा, खर्च वाढतो त्यामुळे ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत मासळी अधिक महाग मिळते. त्यामुळे अनेक ग्रामीण भागात राहणारे नागरिक कामावरून घरी परताना मासळी खरेदी करण्यास अधिक पसंती देतात.

मात्र स्वच्छतेची अत्यंत गरज-

मासळी मार्केटची साफसफाई दररोज केली जाते. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते तसेच मार्केट परिसरातील जागादेखील अडचणीची असल्याने तेथे ग्राहकांना चिखलातून मासळी खरेदी करावी लागते. यासाठी येथे अधिक प्रमाणात स्वच्छतेची आणि प्रामुख्याने नियोजनाची गरज आहे.

मासळीचे दर (प्रतिकिलो)

बांगडे- 100 रु, कर्ली- 300 रु, समुद्री खेकडे- 300 रु, सुंगटे- 300 ते 400 रु, इसवण- 500 ते 550 रु, लेपो- 200 रु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT