Illegal Construction in Vasco Dainik Gomantak
गोवा

वास्कोत सेटबॅक जमिनीवर हॉटेलचे अवैध बांधकाम

गोवा फर्स्टची तक्रार : एचक्यू आस्थापन मालक, व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को : मुख्य रस्त्याशेजारी सेटबॅक जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी स्वातंत्र्य पथ मार्गावरील आयडीबीआय बँक समोरील हॉटेल एचक्यूचे मालक आणि व्यवस्थापनाविरुद्ध पालिकेत तसेच मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणात गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेतर्फे तक्रार दाखल केली आहे. गोवा फर्स्टने केलेल्या तक्रारीनुसार सदर हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीररित्या करण्यात आले आहे. विकास प्राधिकरण कोणत्याही बिल्डरला किंवा जमीन मालकाला सेटबॅक जमिनीवर बांधकामाची परवानगी देत नाही. मात्र सदर हॉटेलचे मालक आणि बिल्डरने या नियमांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Illegal Construction in Vasco News Updates)

सदर हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापनाने सेटबॅक जमिनीवर अतिक्रमण करून एका बाजूला आणि मुख्य प्रवेशद्वाराला एक राखीव भिंत बांधली आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना आणि रस्त्यावरील वाहनांना खूप त्रास होतो. कारण हॉटेलमध्ये (Hotel) एखादा पाहुणा आल्यास प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचारी सामान्य लोकांना फुटपाथवरून जाण्यास मज्जाव करतात. तसेच पाहुण्यांना हॉटेलपर्यंत सोडण्यास आलेली वाहने मुख्य रस्त्यावर उभी करण्यात येतात. यामुळे रस्ता (Road) अरुंद असल्याने संपूर्ण स्वातंत्र्य पथ मार्ग एका टोकाला अडवला जातो. त्यामुळे याचा पादचाऱ्यांबरोबर वाहन चालकांवरही परिणाम होतो. या अतिक्रमणाकडे पालिकेने आणि मुरगाव (Mormugao) नियोजन विकास प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांनी परवाने देताना या बांधकामांविरुद्ध ताकीद देऊन कारवाई करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. आता गोवा फर्स्ट संबंधित अधिकाऱ्यांना या बेकायदेशीर कामाच्या विरोधात त्वरित कारवाई करून अवैध बांधकाम पाडण्यात यावे,अशी मागणी गोवा फर्स्ट ने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT