Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोव्यात राजकीय बदलासाठी नवी समीकरणं! सरदेसाईंची घोषणा; 'गोवा फर्स्ट' तिसरी नव्हे, पहिल्या क्रमांकाची आघाडी

Goa First Alliance Latest New: गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आपचे वेंझी व्हिएगस व काँग्रेस पक्षाचे अमित पाटकर हे तिन्ही नेते एकत्र येणे ही गोव्यातील राजकारणातील तिसरी आघाडी असे म्हटले जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आपचे वेंझी व्हिएगस व काँग्रेस पक्षाचे अमित पाटकर हे तिन्ही नेते एकत्र येणे ही गोव्यातील राजकारणातील तिसरी आघाडी असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले, आम्ही तिघांनी एकत्र येऊन ‘गोवा फर्स्ट’ ही आघाडी केली आहे. ती तिसरी नसून गोव्यातील पहिल्या क्रमांकाची पहिली आघाडी आहे.

गोव्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून अन्य पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी केली जाणार, असे संकेत यापूर्वी दिले जात होते. गेल्या रविवारी हे तिन्ही नेते सार्वजनिकरित्या एकत्र आल्याने ही शक्यता खरी ठरणार हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात सरदेसाई यांना विचारले असता, गोव्यात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या आघाडीचे नावच गोवा फर्स्ट असे आहे, त्यामुळे आम्ही तिसरा पर्याय असूच शकत नाही.

सरदेसाई म्हणाले, कुठल्याही राज्याची प्रगतीचे मोजमाप त्या राज्यातील शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील कामावरून ठरवता येते. गोव्यात या दोन्ही आघाड्यांवर सरकारला अपयश आले आहे. मी आणि पाटकर यापूर्वीही एकत्र होतो. आता त्यात वेंझी व्हिएगस यांची भर पडली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या आप सरकारने दिल्लीत सरकार चालवित असताना शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत केलेली विलक्षण अशी सुधारणा हे एक आहे.

उज्ज्वला योजना निवडणुकीपुरतीच

निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजप सरकारने तीन मोफत गॅस सिलिंडरची उज्ज्वला योजना सुरू केली आहे. ती फक्त निवडणुकीपुरतीच असून, निवडणूक झाल्यानंतर ती गुंडाळून ठेवली जाईल, असे सरदेसाई म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतःच ही योजना या आर्थिक वर्षापुरती असल्याचे यापूर्वी म्हटले आहे. गरज भासल्यास ती पुढे चालू ठेवली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ही योजना आणून आधी लोकांची मते भाजपसाठी घ्यायची आणि जिंकून आल्यानंतर ही बासनात गुंडाळून ठेवायची, अशीच भाजपची रणनीती असणार, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: जीत भाजपमध्ये जाणार?

Budh Nakshtra Gochar 2026: व्यापारात दुप्पट नफा अन् नोकरीत मान-सन्मान! बुधाच्या गोचरने 'या' राशींचे चमकणार नशीब; पैशांनी भरणार तिजोरी

Lung Cancer: गोव्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा वाढता धोका! दरवर्षी 120 ते 150 नवे रुग्ण; महिलांचे प्रमाण 10 वरून थेट 40 टक्क्यांवर

World Highest Paid PM: वर्षाला 26.9 कोटींचे वेतन, अमेरिकन अध्यक्षांपेक्षा 7 पटीने जास्त, पगारात 64 टक्क्यांची वाढ घसघशीत; सिंगापूरचे PM जगातील सर्वात श्रीमंत नेते

Digital India: डिजिटल इंडियाच्या नव्या पर्वासाठी भारत सज्ज! PM मोदींनी 'जीएफएफ'मध्ये मांडली चतु:सूत्री; फिनटेक उद्योगाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT