CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Firefighters: अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणार ‘अग्नी जोखीम भत्ता', पणजीत अग्निशमन सेवा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Pramod Sawant Announces Fire Risk Allowance Goa Firefighters: आगामी आर्थिक वर्षापासून अग्निशमन दलाच्या जवानांना अग्नी जोखीम भत्ता (फायर रिस्क अलाऊन्स) लागू केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त सांतिनेझ येथे अग्निशमन दलातर्फे आयोजित कार्यक्रमात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सार्वजनिक सुरक्षा व सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज आहे. मात्र, काहींना ही सतावणूक वाटते. राज्यात औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसाठी अग्निशमन दलाचे सुरक्षा प्रमाणपत्र घेणे सक्तीचे आहे. आगामी आर्थिक वर्षापासून अग्निशमन दलाच्या जवानांना अग्नी जोखीम भत्ता (फायर रिस्क अलाऊन्स) लागू केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सोमवारी (14 एप्रिल) राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त सांतिनेझ येथे अग्निशमन दलातर्फे आयोजित कार्यक्रमात केली.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, दलाचे संचालक नितीन रायकर, आजी - माजी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष कामगिरी केलेल्या तसेच दलातर्फे मुलांच्या दोन गटात घेण्यात आलेल्या पोस्टल स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आले. वाळपई अग्निशमन दलासाठी त्यांच्या हस्ते पाण्याच्या बंबच्या वाहनाचे उद्‍घाटन करण्यात आले.

दलातर्फे घेण्यात आलेल्या पोस्टल स्पर्धेत ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. वयोगट ७ ते १० यामध्ये सारा बांदेकर (प्रथम), जिव्या नार्वेकर (दुसरे), तेजश्री नाईक (तिसरे) व वयोगट ११ ते १४ यामध्ये कविश देविदास (प्रथम), आयुष दळवी (दुसरे) व तानी च्यारी (तिसरे) या विजेत्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT