Anjuna Vagator Beach Dainik Gomantak
गोवा

Anjuna Vagator Beach: हणजूण वागतोर बीचवर आतषबाजीच्या फटाक्यांमुळे आग; सुदैवाने जीवित हानी टळली

Anjuna Vagator Beach: प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Vagator Beach: हणजूण वागतोर बीचवर आतषबाजीचे फटाके फोडताना किनाऱ्यालगतच्या सुकलेल्या गवताला आग लागल्याची घटना घडली आहे. किनाऱ्यावर फटाक्याची ठिणगी उडून लगतच्या गवताने पेट घेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

घडलेल्या घटनेसंबंधी स्थानिकांकडून अशी माहिती मिळाली की, शुक्रवारी वागातोर बीचवर कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान किनाऱ्यावर आतषबाजीने फटाके लावण्यात आले होते.

यावेळी समुद्रातून वाऱ्याचा झोत किनाऱ्याच्या दिशेने आल्यावर लावलेले फटाके उडून लगतच्या वाळलेल्या गवतावर पडले. परिणामी गवताने पेट घेतला. याच ठिकाणी काही पर्यटक जमा झाले होते. सुदैवाने त्यातील कुणालाही इजा झाली नाही.

दरम्यान अशीच एक घटना यापूर्वीही घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र भविष्यातील धोकादायक घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन स्थानिकांनी केलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT