Goa Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat : फेरीबोटीत वाहनांना शुल्क आकारण्यास ‘आरजी’चा आक्षेप

परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर फेरीबोटीतून वाहने नेण्यास शुल्क लावल्याने खरमरीत टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Ferry Boat : पणजी, हल्लीच नदी परिवहन विभागाने फेरीबोटीतून वाहने नेण्यास लावलेल्या शुल्कावर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने आक्षेप घेतला आहे. फेरीबोट चालणाऱ्या कित्येक ग्रामीण भागातील लोकांवर हा अन्याय असल्याचे आरजीचे नेते अजय खोलकर म्हणाले.

गुरुवारी पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर फेरीबोटीतून वाहने नेण्यास शुल्क लावल्याने खरमरीत टीका केली.

अजय खोलकर यांनी सांगितले, की नदी परिवहन खाते त्यांना संमत झालेल्या वार्षिक खर्चातून ५ कोटी रुपयांची बचत करत आहे. असे असूनही मंत्री फळदेसाई हे सामान्य जनतेकडून कर वसुली आणि महसूल गोळा करण्याच्या गोष्टी करत आहेत.

जेव्हा नदी परिवहन खात्याकडे ५ कोटी एवढा निधी असूनही मंत्री फळदेसाई यांना महसूल मिळवायचे का सुचत आहे.

यावेळी आरजीच्या चोडण भागातील काही सदस्यांनी त्यांची कैफियत मांडताना नमूद केले की गेली अनेक वर्षे दिवाडी, चोडण, पोंबुर्पा भागातील शेकडो लोक फेरीबोटीतून प्रवास करत आहेत.

खास करून हजारो लोक कामाला, शिकायला फेरीबोटीतून इतर ठिकाणी प्रवास करतात. आता हे शुल्क लावल्याने सामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे.

नागरिकांत जागृती करणार

फेरीबोटीत वाहनांना शुल्क आकारण्यास विरोध करून आरजी पक्ष स्थानिक लोकांमध्ये जागृती करणार आहे. गरज पडल्यास पंचायतीत खास ग्रामसभा घेण्यास भाग पाडू आणि फेरीबोट प्रवासावरील कर काढून टाकायला लावू, असे अजय खोलकर यांनी सांगितले. फेरीबोट प्रवासासाठी वाहनांना शुल्क लागू केल्याचा आरजीने निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT