Goa FDA Food Inspection Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa FDA Food Inspection: अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हणजूण, वागातोर आणि म्हापसा परिसरात धडक मोहीम राबवून विविध अन्न व्यावसायिकांची तपासणी केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हणजूण, वागातोर आणि म्हापसा परिसरात धडक मोहीम राबवून विविध अन्न व्यावसायिकांची तपासणी केली. यावेळी अस्वच्छता आढळल्याने तीन व्यावसायिकांना त्यांचे कामकाज तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले.

तसेच, नियमांचे उल्लंघन करून विकले जाणारे ३० हजार रुपयांचे तब्बल ६० किलो काजू जप्त करून जागेवरच नष्ट केले. या मोहिमेदरम्यान रेस्टॉरंट्स खाद्यपदार्थ विक्रेते आणि काजू विक्रेत्यांसह एकूण १८ अन्न व्यवसायांची तपासणी करण्यात आली. या व्यतिरिक्त पथकाने स्ट्रीट फूड विक्रेते आणि हॉटेल्स अशा ७ व्यावसायिकांकडील वापरलेल्या खाद्यतेलाची ‘टीपीसी मीटर’द्वारे जागेवरच तपासणी केली.

या तपासणीत खाद्यतेलातील टोटल पोलर कंपाऊंड्सचे प्रमाण २५ टक्क्यांच्या मर्यादेत म्हणजेच सुरक्षित पातळीच्या आत आढळले. या पथकाने येथील ‘अलंकार क्लस्टर’चीही पाहणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने थेट निलंबित केले जातील, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही धडक कारवाई संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीए पथकाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT