Goa FDA Dainik Gomantak
गोवा

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa FDA Food Safety Inspection: अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने राज्यभरातील तब्बल २,५२८ अन्न आस्थापनांची तपासणी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: अन्न सुरक्षा यंत्रणेने (एफडीए) राज्यभरात गेल्या ३ महिन्यांत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात व्यापक तपासणी मोहीम राबवून सुमारे ३ टन निकृष्ट अन्नसाठा जप्त करून नष्ट केला आहे, तसेच तपासणीदरम्यान ८३ अन्न नमुने मानकांनुसार नसल्याचे उघडकीस आणले आहे.

अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने राज्यभरातील तब्बल २,५२८ अन्न आस्थापनांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान एकूण १,५३२ नमुने गोळा करण्यात आले होते, ज्यापैकी ८३ नमुने सुरक्षिततेच्या निकषांवर अपयशी ठरले.

या धडक कारवाईत अन्न व्यावसायिकांवर एकूण २०.४३ लाख रुपयांचा दंड आणि तडजोड शुल्क आकारण्यात आले असून, सुधारणा करण्यासाठी ४२२ व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय, नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने दोन परवाने निलंबित केले असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर १३ खटले दाखल केले आहेत.

विभागाच्या कारवाई अहवालानुसार, देखरेखीदरम्यान सुमारे ६.३६ लाख रुपये किमतीचा २,९६७.१ किलो अन्नसाठा ताब्यात घेऊन तो नष्ट करण्यात आला आहे. प्रशासनाची ही मोहीम केवळ नियमित तपासणीपुरती मर्यादित नव्हती. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध भागांत एफडीएने २९३ विशेष तपासणी मोहिमा राबवल्या; यात प्रामुख्याने पहाटे आणि रात्री उशिरा अचानक घेतलेल्या झडतींचा समावेश होता. या मोहिमांमध्ये विशेषतः भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बंदी घालण्यात आलेल्या कृत्रिम रंगांच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

‘एफडीए’ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे अन्न सुरक्षा अधिकारी नियमित व विशेष मोहिमांद्वारे सातत्याने नजर ठेवून आहेत आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’मधील तरतुदींनुसार कडक कारवाई केली जात आहे. ही तपासणी मोहीम नियोजनबद्धरितीने पुढेही सुरूच राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी आलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

LPG Price: व्यावसायिक गॅस सिलिंडर 70 रुपयांनी महागला; घरगुती गॅसचे दर मात्र 'जैसे थे'

SCROLL FOR NEXT