Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Goa News: कर थकबाकी हप्त्यांनी भरू द्या!

Goa News: 20 कोटी थकित : मडगावातील व्यापाऱ्यांची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa News: मडगाव पालिकेची कर थकबाकी हप्त्यांनी भरण्याची सोय करावी, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. तशी योजना पालिकेने कार्यान्वित केल्यास कर भरणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याविषयी मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर म्हणाले की, हफ्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची संधी दिल्यास व्यापाऱ्यांनाही ते सोपे होणार आहे आणि पालिकेलाही जलद गतीने महसूल मिळेल.

कर थकबाकी असलेल्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, कोविड महामारीच्या काळात आम्हाला बरेच नुकसान सोसावे लागले. त्यातच ग्राहक कमी होते.

कोविड महामारीचा फटका

मडगाव पालिकेची कर थकबाकी 20 कोटींच्या आसपास असून यात घरपट्टी आणि व्यावसायिक कराचा समावेश आहे. यात व्यावसायिक कर भरणा मोठ्या प्रमाणात पालिकेला येणे बाकी आहे. मागील दोन वर्षांच्या काळात कोविड महामारीमुळे अनेकांना नुकसान सोसावे लागले.

त्यामुळे कर थकबाकीची सर्व रक्कम एकाचवेळी भरणे शक्य नसल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. ही रक्कम हप्त्याने भरण्याची सोय पालिकेने करावी. त्यामुळे आम्हालाही कर भरणे सोपे होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नगराध्यक्षांकडून हिरवा कंदील

याविषयी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले की, थकबाकी गोळा करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे की, संपूर्ण थकबाकीपैकी अर्धी रक्कम कोणी भरत असल्यास ती जमा करून घ्यावी.

तसेच पालिकेतही थकबाकीतील काही रक्कम हप्त्यांनी भरण्याची सोय केली आहे. गेल्या दहा दिवसांत सुमारे 23 लाख रुपये थकबाकी गोळा करण्यात आली आहे. यापुढेही थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच राहाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT