Fatorda MLA Vijai Sardesai Statement On Mahadayi Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: हा कसला विजय, हे तर आजचे मरण जुलै पर्यंत ढकलले गेले : विजय सरदेसाई

आंदोलन तळागाळात पोहोचण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष मदत करणार

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Vijai Sardesai : म्हादई संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने जो काय निकाल दिला तो गोव्याच्या हिताचा आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणत आहेत. पण प्रत्यक्षात या निर्णयामुळे गोव्याचे कसलेच हित साध्य झाले असे वाटत नाही. फक्त आजचे मरण जुलै पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे एव्हढेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रीया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज व्यक्त केली.

आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले, म्हादईचा ज्वलंत प्रश्न कर्नाटक राज्यांतील निवडणूक पार पडेपर्यंत शितपेटीत टाकण्याच्या केंद्र सरकारच्या करस्थानाचाच हा विजय असे म्हणावे लागेल.

कर्नाटक राज्यातील निवडणूक 21 मे ला संपणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात पुढील सुनावणी जुलै महिन्यात ठेवण्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सरदेसाई म्हणाले, "म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कळसा आणि भांडूरा येथे जे काम चालू आहे ते बंद करण्यासाठी गोवा सरकारने अंतरिम स्थगिती मागितली होती. पण ही स्थगिती देण्यात आलेलीच नाही."

"उलट सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय कर्नाटक सरकारला पाणी वळविता येणार नाही ही जल विवाद लावादाचा निर्णय कायम आहे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे."

"त्यामुळे हा गोव्याचा विजय कसा असा सवाल करत खरे तर गोव्यासाठी हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल. ज्या वन संवर्धन कायद्याच्या कलम 29 नुसार गोव्याला दिलासा मिळेल अशी जी आशा व्यक्त केली जात तीही फोल ठरली आहे."

"गोवा सरकारने मुख्य वन्यजीव वॉर्डनकडे जी तक्रार केली आहे. त्या तक्रारीवर काय निर्णय होतो ते पाहिल्यावर या प्रश्नावर विचार करता येईल असे न्यायालयाने म्हटले असल्याने गोव्याची सगळ्याच बाजूंनी पिछेहाट झाल्याचे सिद्ध झाले आहे" असे सरदेसाई म्हणाले.

"कर्नाटक राज्याचा पास झालेला डीपीआर अहवाल मिळविण्यासाठी गोवा सरकारला न्यायालयात धाव घ्यावी लागते यासारखे दुर्दैव नाही. याचा अर्थ म्हादई प्रश्र्नी केंद्र सरकार गोव्याला सहकार्य करण्याच्या तयारीत बिलकुल नाही हे स्पष्ट होत आहे."

"म्हादई बाबत गोव्याचा गळा घोटण्याचे षडयंत्र केन्द्र सरकारने रचले असून या षडयंत्रात गोव्याचे मुख्यमंत्री सामील आहेत. हे सर्व कारस्थान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे म्हादई बचाव आंदोलन राज्याच्या काना कोपऱ्यात पोहोचण्याची गरज असून त्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष सर्व ती मदत करण्यासाठी तयार आहे" असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT