Margao Municipal Council | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Damodar Shirodkar: मडगाव नगरपालिका थकबाकी वसुलीस वेग

दैनिक गोमन्तक

Damodar Shirodkar: मडगाव नगरपालिकेची काही वर्षांपासून रखडून पडलेली कर थकबाकीची वसुली जोरात सुरू आहे. मागील 15 दिवसांच्या काळात चाळीस लाख रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. याबरोबर पलिकांतर्गत भेडसावत असलेली कचरा समस्या सोडविण्याच्या कामालाही प्रधान्य देण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

दामोदर शिरोडकर हे मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यास 1 महिना 2 दिवस पूर्ण झाले आहेत. या पदाचा ताबा घेतल्यानंतर पालिकेची कर थकबाकी वसूल करण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. याला थकबाकीदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

गेल्या 15 दिवसांच्या काळात एकंदरीत 40 लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.

सोनसोडो कचरा यार्डवर यापूर्वी दोन बेलिंग मशिन कार्यरत होत्या. आता या ठिकाणी आणखी एक बेलिंग मशिन आणले आहे. याबरोबरच नेसाय या ठिकाणीही एक बेलिंग मशिन कार्यरत करण्यात आले आहे.

सोनसोडो व्यवस्थापन समिती

सोनसोडो कचरा यार्डवर कित्येक काळापासून पडून असलेला सुका कचरा फेब्रुवारी 2023 पर्यंत हटविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कचरा समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 10 सदस्य असलेली सोनसोडो व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

सोनसोडो कचरा यार्डवर कचऱ्याचा आढावा घेण्यासाठी दर दोन दिवसांनी या समितीकडून भेट देण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष शिरोडकर यांनी दिली.

"थकबाकीच्या वसुलीला थकबाकीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर थकबाकीदारांनी आपली थकबाकी नगरपालिकेत जमा करावी तसेच वसुलीसाठी येणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

त्यामुळे नगरपालिकेत खोळंबून पडलेल्या इतर कामांना चालना मिळणार आहे. नगरपालिकेच्या विकासकामांना स्थानिक आमदार दिगंबर कामत व मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतर मंत्र्यांचे मार्गदर्शन लाभत आहे."

- दामोदर शिरोडकर, मडगावचे नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

SCROLL FOR NEXT