Goa LIC  Dainik Gomantak
गोवा

Goa LIC फायनान्सच्या मालमत्तांची किंमत दुप्पट घेऊन एकाची फसवणूक

Goa: फायनान्सच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला याची वर्दी देऊनही या बनावटगिरी विरोधात कोणतीच चौकशी करण्यात आली नव्हती.

दैनिक गोमन्तक

Goa: एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या व्यवस्थापकालाच हाताशी धरून कमी किमतीच्या मालमत्तांची किंमत दुप्पट दाखवून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्याचा प्रकार सध्या उघडकीस आला. फातोर्डा पोलिसांनी व्यवस्थापक हेमंत सूर्यवंशी याच्यासह कर्ज घेणाऱ्या मडगाव येथील रामचंद्र कोडपुल्ली व राय येथील मिनिन झेवियर या दोन कर्जदारावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

फायनान्सच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला याची वर्दी देऊनही या बनावटगिरी विरोधात कोणतीच चौकशी करण्यात आली नव्हती. या प्रकरणी या एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स कंपनीतर्फे मालमत्तांचे मूल्यांकन करणारे अधिकारी जोसेफ किरांचिरा यांनी ही तक्रार दिली असून आपली बनावट सही करून आणि बनावट शिक्का वापरून मूल्यांकन अहवाल ही कर्जे संमत केली.

झेवियर यांच्या जमिनीची किंमत 3.97 कोटी रुपये असताना ती वाढवून 5.09 कोटी रुपये अशी दाखविण्यात आली आहे. तर कोदुपुल्ली यांच्या बंगल्याची किंमत 54 लाख रुपये असताना ती वाढवून 98 लाख इतकी दाखवून मालमत्तेच्या किंमती पेक्षा अधिक कर्ज देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

कर्जांचे किमान 700 प्रस्ताव पास

याप्रकरणी जून 2000 मध्ये पहिली तक्रार करण्यात आली होती, त्यावेळी या प्रकरणी कार्यालयीन चौकशी करावी, असे पोलिसांनी नमूद करून एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविली होती. ज्या व्यवस्थापकावर सध्या एफआयआर दाखल झाला आहे, त्याच्या कारकिर्दीत कर्जांचे किमान 700 प्रस्ताव पास झाले असल्याने या भानगडीची व्याप्ती बरीच मोठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT