Panchayat Mandal Dainik Gomantak
गोवा

Goa: फातर्पा ग्रामसभा स्मशानभूमी प्रकरणी चांगलीच गाजली; पंचायत मंडळाला धरले धारेवर

स्मशानभूमीला ताळे ठोकल्या बद्दल ग्रामस्थानी ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व सत्ताधारी गटातील पंच सदस्यांना जाब विचारुन ग्रामसभेत गोधळ घातला.

दैनिक गोमन्तक

कुंकळळी: फातर्पा पंचायत (Fatarpa Panchayat) क्षेत्रातील ग्रामस्थानी हाती घेतलेले स्थानिक स्मशानभूमीच्या स्वछता व सौंदर्यीकरणाचे काम पंचायत मंडळाने बंद पाडून स्मशानभूमीला ताळे ठोकल्या बद्दल ग्रामस्थानी ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व सत्ताधारी गटातील पंच सदस्यांना जाब विचारुन ग्रामसभेत गोधळ घातला.

रविवार दि.22,रोजी फातर्पा पंचायतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. सरपंचा नितल नाईक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाल्यावर ग्रामस्थानी स्मशानभूमीचे सौंदर्यीकरणाचे काम रोखल्या बध्दल सरपंचांना जाब विचारला पंचायतीच्या गैर व्यवस्थापणामुळे व निष्काळजीपणा मुळे हिंदू स्मशानभूमीला बकाळ रूप आले होते व जंगली वनसस्पतीने व्यापले होते.

जर ग्रामस्थानी काही भल्या लोकांच्या सहायाने जर सौंदर्यीकरण काम हाती घेतले तर पंचायतीचे काय नुकसान झाले असा मुद्धा उपस्थित करून ग्रामस्थानी सरपंचांना व उपसरपंचाना घेतले.पंचायत स्वता काही करू शकत नाही व इतरानी काम हाती घेतले तर हरकत घेते हे राजकारण कोणाला खुश करण्यासाठी करतात असा प्रश्न विराज देसाई यांनी उपस्थित केला.

उपसरपंच बाप्तिस फेर्नांडिस यांना हिंदू स्मशानभूमीला ताळे ठोकन्याचा अधिकारी कोणी दिला असा प्रश्न ग्रामास्थानी विचारला ग्रामस्थाचा विशेष करून महिलांचा रौद्र अवतार पाहून बंद पडलेले सौंदर्यीकरण काम सुरू करण्याची मान्यता देण्याचे पंचायत मंडळाने कबूल केले.या वेळी संतप्त ग्रामस्थानी ग्रामसभेत गोधळ घातला व काही ग्रामस्थ उपसरपंचावर धावून गेले.जर ख्रिस्ती दफन भूमीला ताळे ठोकण्याचे धाडस उपसरपंचाने केले असते का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT