Goa Agriculture| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: जास्तीत जास्त युवकांना शेतीकडे वळविण्यासाठी सरकारने साहाय्य करावे

कायतान फर्नांडिस : भाताच्या रोपांचा प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: पूर्वी शेतकरी शेतामध्ये स्वत:च प्रत्यारोपण करीत असत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्‍त पिकांबरोबरच चांगले उत्पन्न मिळत असे. आता सर्वच शेतकरी अत्‍याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करीत आहेत. मात्र राय येथील 55 वर्षीय कायतान फर्नांडिस यांनी स्वत:च शेती लागवड करण्‍याचा प्रयोग केला. विशेष म्‍हणजे तो चांगलाच यशस्‍वी ठरला आणि त्‍यांना घसघशीत उत्‍पन्नही मिळाले.

कायतान फर्नांडिस हे स्वत:च्या शेतामध्ये काम करतातच शिवाय आपल्‍या मित्रांची, शेजाऱ्यांची शेतीही फुलवितात. धान्य विकून जे बाकी राहते, ते गरीब व गरजूंना वितरित करतात. आपल्याला नापीक शेतजमीन पाहवत नाही. आपल्या गावामध्ये सर्वच शेतजमिनीतून हिरवीगार शेती डौलाने उभी रहावी, अशी आपली इच्छा असल्याचे त्‍यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

गेल्‍या 30 ते 35 वर्षांपासून आपण शेतीव्‍यवसायात आहे. शेतीच्‍या या प्रदीर्घ अनुभवातून  मी एक सांगू  शकतो की, शेतीत स्वत: काम केल्यास, रोपट्यांचे प्रत्यारोपण स्वत: केल्यास तसेच  स्वत: देखरेख केल्यास जास्त उत्पन्न मिळू शकते. 

जास्तीत जास्त युवकांना शेतीकडे वळविण्यासाठी सरकारने त्यांना योग्य प्रकारे आर्थिक साहाय्य करणे आवश्यक आहे. बी-बियाणे, खतांचे भाव वाढलेले आहेत. शेती सभोवताली कुंपण उभे करण्यास पुष्कळ पैसे लागतात. शिवाय मजुरांनाही दिसवडाही द्यावा लागतो. त्‍यामुळे शेतीव्‍यवसायावर मर्यादा येतात, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्त केली.

"गेल्‍या 30 ते 35 वर्षांपासून मी शेतीव्‍यवसायात आहे. या प्रदीर्घ अनुभवातून मी एक सांगू शकतो की, शेतीत स्वत: काम केल्यास, रोपट्यांचे प्रत्यारोपण स्वत: केल्यास तसेच स्वत: देखरेख केल्यास हमखास जास्त उत्पन्न मिळू शकते."

- कायतान फर्नांडिस, शेतकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT