Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : कुंभारजुवेत स्वच्छतेसाठी चार कचरा रिक्षांची सोय : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Goa News : आमदार फळदेसाई यांनी स्वखर्चाने सुरू केलेल्या या स्वच्छता मोहिमेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौतुक करताना लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

तिसवाडी, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी स्वखर्चाने कुंभारजुवे मतदारसंघात स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फळदेसाई यांनी स्वखर्चातून चार रिक्षा खरेदी केल्या असून मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये फिरून त्या रिक्षा कचरा गोळा करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कुंभारजुवे स्वच्छता मोहिमेचा शनिवार, २४ रोजी शुभारंभ करण्यात आला.

आमदार फळदेसाई यांनी स्वखर्चाने सुरू केलेल्या या स्वच्छता मोहिमेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौतुक करताना लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदारांच्या पुढाकाराला लोकांची साथ मिळाल्यास कुंभारजुवे मतदारसंघ राज्यात स्वच्छ आणि सुंदर ठरण्यास वेळ लागणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शक्य नाही. अनेकदा सांगूनही लोक रस्त्याशेजारी प्लास्टिक व इतर कचरा फेकतात. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन चार रिक्षा खरेदी केल्या आहेत. मतदारसंघातील पंचायतींमार्फत कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कचरा रस्त्यावर उरता कामा नये, तो तत्काळ उचलला गेला पाहिजे. या चार रिक्षांमध्ये प्रत्येकी १ चालक व दोन मजूर अशा एकूण १२ जणांना रोजगारही मिळणार आहे.

- राजेश फळदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT