Goa drivers protest Dainik Gomantak
गोवा

EV Bus Strike: पणजीच्या प्रवाशांना 'स्मार्ट शॉक', 48 इलेक्ट्रिक बसेस अचानक गायब; वेतन थकल्यामुळे बस चालकांचा संप

Goa EV bus strike: शहरातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या या ४८ इलेक्ट्रिक बसेस अचानक बस स्थानकावर न आल्याने पणजी बसस्थानकावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला

Akshata Chhatre

Panjim EV Bus Strike: गोव्याची राजधानी पणजी येथे मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी प्रवाशांना 'स्मार्ट शॉक' बसला, कारण एकही 'स्मार्ट सिटी' इलेक्ट्रिक बस सेवेसाठी हजर झाली नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या या ४८ इलेक्ट्रिक बसेस अचानक बस स्थानकावर न आल्याने पणजी बसस्थानकावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. ऑफिसला जाणारे आणि विद्यार्थी तासन्तास बसची वाट पाहत राहिले, परिणामी अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

संपामुळे सेवा ठप्प; चालकांचे 'वेतनाचे' कारण

मिळालेल्या माहितीनुसार, या गोंधळामागे बसेसमध्ये तांत्रिक बिघाड नसून, बस चालकांनी पुकारलेला संप हे प्रमुख कारण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून चालकांचे वेतन (Payment) थकीत असल्याने त्यांनी कामावर हजर न राहण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी मिशन' प्रकल्पांतर्गत या इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जातात आणि त्या पणजीच्या दैनंदिन वाहतूक नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ऐन गर्दीच्या वेळी सर्वच्या सर्व ४८ बसेस बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

प्रवाशांचे हाल आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या अचानक झालेल्या संपामुळे पणजीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या बसेसमध्येच चालकांना वेळेवर वेतन मिळत नसेल, तर या 'स्मार्ट' व्यवस्थेच्या व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. तातडीने या समस्येचे निराकरण न झाल्यास, भविष्यातही शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT