Goa Electricity Connection Rule Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Electricity Connection Rule: अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला साइट तपासणीचा अहवाल तसेच कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांकडून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक

Akshata Chhatre

गोवा वीज विभागाने वीज जोडणी मंजूर करण्यासाठी नियम आणखीन कठोर केले आहेत. बेकायदेशीर बांधकामांसाठी वीज आणि पाण्याची जोडणी मिळविण्यासाठी गोवा सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1985 या कायद्याचा गैरवापर झाल्याने उच्च न्यायालायने या प्रकारची संपूर्ण दखल घेण्याचे आदेश दिले होते आणि कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी आता राज्यात नियम कठोर केले जाणार आहेत.

नवीन नियमांनुसार वीज जोडणीच्या संदर्भातील सर्व अर्ज विभागाच्या प्रमुख कार्यालयाकडून मंजुरीसाठी पाठवले जाणं अनिवार्य असेल.

हा अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला साइट तपासणीचा अहवाल तसेच कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांकडून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असले. बेकायदेशीरपणे वीज जोडण्याच्या प्रकारांवर आळा बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बेकायदेशीर बांधकामांसाठी वीज आणि पाण्याची जोडणी मिळवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य कायद्याचा सर्वाधिक गैरवापर केल्याचे निरीक्षणात आल्याने, गोव्यात घडलेल्या या प्रकारावर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातून या प्रकारांचं निर्मूलन होण्यासाठी उच्च न्यायालयाने अशा बांधकामांना गोवा सार्वजनिक आरोग्य अधिनियम या कायद्यांतर्गत पाणी आणि वीज जोडण्याचे अनुदान बंद करण्याची सूचना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT